देशाला आणखी एका मनमोहन सिंह यांची गरज आहे: शरद पवार

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 12, 2020 | 11:03 IST

शरद पवार यांनी दुसऱ्या भागातील मुलाखतीत मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत आता देशाला दुसऱ्या मनमोहन सिंहाची गरज आहे असं म्हटलं आहे.

pawar
शरद पवार  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • शरद पवार यांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा
  • देशाला आणखी एका मनमोहन सिंह यांची गरज आहे.
  • संजय राऊतांनी घेतलेलय मुलाखतीत पवारांची भाजपवर टीका

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Shara Pawar) यांची विशेष मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतली आहे. याच मुलाखतीचा दुसरा भाग आज (१२ जुलै) प्रक्षेपित करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी देशाच्या अर्थव्यवेस्थेसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचं राजकारण आणि विशेषत: चीनसोबत जो तणाव निर्माण झाला आहे त्याविषयी त्यांनी भाष्य केलं आहे. आजच्या मुलाखतीत शरद पवारांनी अर्थव्यवस्थेबाबत बरीच चिंता व्यक्त केली. यामुळे आता देशाला एका 'मनमोहन सिंह' यांची गरज आहे. असं परखड मत त्यांनी वयकत केलं आहे. “अर्थव्यवस्था साफ कोसळली आहे. ती सावरण्यासाठी देशाला आणखी एका मनमोहन सिंगांची गरज आहे, पण मोदी सरकारला तज्ञांचे सल्ले नकोत!” असं पंतपधान मोदींना सुनावलं आहे.

या देशाला एका मनमोहन सिंगांची गरज आहे का?, या संजय राऊतांच्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, 'हंड्रेड पर्सेंट गरज आहे. कारण मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर झाले तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी होतो. मला माहितीय की, त्या वेळेला फायनान्शियल क्रायसेसमधून कसे आम्ही जात होतो, पण मनमोहन सिंगांनी एक नवीन दिशा दिली. या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं त्या मनमोहन सिंगांना मी श्रेय देतो तसं नरसिंह रावांनाही श्रेय देतो. या दोघांनी नेहमीच्या चौकटीचा रस्ता बदलून वेगळय़ा वळणावर गाडी नेली आणि सबंध अर्थव्यवस्था सावरली. आज त्याची आवश्यकता होती. तशा प्रकारच्या तज्ञ लोकांची मदत घेऊन मोदी साहेबांनी पावलं टाकायला हवीत. माझी खात्री आहे, अशा कोणत्याही प्रयत्नांना देश सहकार्य करेल.'

'मला असं दिसतंय की, पंतप्रधानांनी इतर पक्षांच्या काही जाणकार लोकांशी बोलण्याची गरज आहे. संकटाची व्याप्ती पाहता कुठल्या तरी एकाच पक्षाने हे सर्व आपणच सोडवून टाकू ही भूमिका घेऊन चालणार नाही. या वेळेला ज्यांची ज्यांची मदत होणं शक्य आहे, उपयुक्त आहे त्या सगळय़ांना बरोबर घेण्यासंबंधी प्रयत्न केला पाहिजे. आज मोदी साहेबांचा जो सेटअप आहे, त्या सेटअपमध्ये अनेक सहकारी असे आहेत की, या अशा प्रकारच्या कामाचा अनुभव त्यांना नाही. कोरोनाचं म्हणाल तर, आम्हालाही तसा अनुभव कुणालाही नाही. कारण असं संकट आपण कधी पाहिलेलंच नव्हतं, पण या संकटावर मात करण्यासाठी ज्या प्रकारची पावलं टाकायला सगळय़ांची साथ घेतली पाहिजे त्याची आम्हाला कमतरता दिसते. सर्वांना सोबत घेऊनच या संकटावर मात करता येऊ शकेल.' असं शरद पवार यावेळी म्हणाले.

पाहा शरद पवार यांची मुलाखत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी