कुरिअर कंपनीच्या कामगाराला लोकांसमक्ष भोसकले, कुर्ला रेल्वे स्थानकावरील घटना

कुर्ला रेल्वेस्थानकाजवळ एका मास्क घातलेल्या हल्लेखोराने कुरिअर कंपनीच्या एका कामगाराला भोसकले. शनिवारी दुपारी ही घटना घडली. हल्ल्यानंतर या माणसाला जखमी अवस्थेत सोडून हल्लेखोर फरार झाला.

Courier company employee stabbed in front of public, left to die on Kurla railway station
कुरिअर कंपनीच्या कामगाराला लोकांसमक्ष भोसकले, कुर्ला रेल्वेस्थानकावर मरण्यासाठी दिले सोडून  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • भरदुपारी कुर्ला रेल्वेस्थानकाजवळ क्रूर हल्ला
  • संशयित हल्लेखोराची ओळख अद्याप पटलेली नाही
  • पीडिताकडचे पैसे हल्लेखोराने नेले नाहीत

मुंबई: मुंबईतील कुर्ला रेल्वेस्थानकाजवळ (Kurla railway station) शनिवारी एका कुरिअर कंपनीच्या कामगाराला (courier company employee) भोसकल्याचा (stabbing) प्रकार घडला. हल्ल्यानंतर त्या व्यक्तीला जखमी (injured victim) अवस्थेत तसेच सोडून हल्लेखोर फरार (attacker fled) झाला. भरदुपारी साधारण ३:४५ वाजता ही घटना घडली. पीडित व्यक्तीला भोसकणाऱ्या संशयित हल्लेखोराने त्याच्याजवळचे २ लाख रुपये देखील चोरलेले नाहीत.

कामावरून परत येत होता पीडित कर्मचारी

या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव फय्याज नेमपूरवाला असे असून तो एका कुरिअर कंपनीत काम करत होता. हल्ल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. हा पीडित मुंब्र्याचा रहिवासी असून कसाईवाडा, कुर्ला (पूर्व) इथे तो काम करत असे. आपले काम संपवून तो कुर्ला रेल्वेस्थानकावरील पादचारी पूल ओलांडत होता.

हल्लेखोराने धारदार सुरीने केला हल्ला

फय्याज नेमपूरवाला हा फलाट क्रमांक ६ आणि ८ यांच्यादरम्यान असताना मास्क घातलेल्या एका व्यक्तीने त्याला मागून पकडले आणि एका धारदार चाकूने त्याच्यावर हल्ला केला. त्याने फय्याजच्या छातीवर आणि कमरेवर वार केले. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार या हल्ल्यानंतर फय्याज खाली कोसळला आणि त्याला खूप रक्तस्राव होऊ लागला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी स्थानक व्यवस्थापकाला या घटनेची माहिती दिली. एका जीआरपी अधिकाऱ्याने सांगितले की संशयित हल्लेखोर हा पीडिताचा पाठलाग करत असल्याचा संशय आहे. त्याने आपला चेहरा मास्कने झाकलेला होता.

सीसीटीव्ही फुटेजवरून संशयिताला ओळखण्यात अपयश

या अधिकाऱ्याने पुढे म्हटले, “या पीडित व्यक्तीच्या फोनवरून आम्ही त्याच्या कुटुंबियांचा संपर्क क्रमांक शोधला आणि त्यांना या घटनेची माहिती दिली.” पीडिताचा भाऊ फरहान याने सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र त्याला हल्लेखोराचा चेहरा ओळखता आला नाही. त्याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की त्याचे कुणाशीही वैर किंवा भांडण नव्हते. याप्रकरणी भारतीय दंडसंहिता कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी