Anil Deshmukh अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 02, 2021 | 18:08 IST

Court sends Anil Deshmukh to ED custody विशेष पीएमएलए कोर्टाने खंडणी वसुली आणि पैशांची अफरातफर या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी दिली.

Court sends Anil Deshmukh to ED custody
अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी 
थोडं पण कामाचं
  • अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी
  • कोठडीत घरचे अन्न आणि औषधे देण्यास विशेष पीएमएलए कोर्टाने परवानगी दिली
  • ईडी चौकशी करेल त्यावेळी अनिल देशमुख यांच्या वकिलाला तिथे हजर राहता येईल

Court sends Anil Deshmukh to ED custody । मुंबईः विशेष पीएमएलए कोर्टाने खंडणी वसुली आणि पैशांची अफरातफर या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी दिली. ईडीने देशमुखांना १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी दिली. 

याआधी सोमवारी सकाळी ईडीच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी अनिल देशमुख हजर झाले. सतत मीडियासमोर राहणारे देशमुख वारंवार समन्स बजावूनही ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणे टाळत होते. ईडीने शोधून अटक करण्याची तयारी सुरू केली आणि अनिल देशमुख हजर झाले. देशमुखांची १२ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी झाली. चौकशीत देशमुख यांच्याकडून अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नाही. अखेर ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली.

अटकेची कारवाई सोमवार-मंगळवार दरम्यान मध्यरात्री झाली. खंडणी वसुली आणि पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी ईडीच्या मुंबई कार्यालयाने अनिल देशमुख यांना अटक केली. अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन देशमुखांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीनंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. चौकशीसाठी ईडीने देशमुखांना १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी दिली. 

अनिल देशमुख यांनी केलेल्या विनंती अर्जाचा विचार करुन त्यांना कोठडीत घरचे अन्न आणि औषधे देण्यास विशेष पीएमएलए कोर्टाने परवानगी दिली. ईडी चौकशी करेल त्यावेळी अनिल देशमुख यांच्या वकिलाला तिथे हजर राहता येईल. यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी