Covid-19 Omicron Cases Maharashtra 27 Dec Update: महाराष्ट्रात आढळले ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 31 नवे रुग्ण ; राज्यातील एकूण रुग्णसंख्या 141 वर

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 27, 2021 | 09:10 IST

Covid-19 Omicron Cases in Maharashtra News Today: कोरोना (Corona) महामारीने परत एकदा जगात कहर करायला सुरुवात केली आहे. कोरोनाचे ओमायक्रॉन (Omicron) प्रकार यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ब्रिटन (Britain), फ्रान्स (France), इटली (Italy)मध्ये रेकॉर्डब्रेक प्रकरणे समोर येत आहेत.

Omicron Cases Maharashtra
महाराष्ट्रात आढळले ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 31 नवे रुग्ण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ब्रिटन (Britain), फ्रान्स (France), इटली (Italy)मध्ये रेकॉर्डब्रेक प्रकरणे समोर येत आहेत
  • दिल्ली आणि महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण

Covid-19 Omicron Cases in Maharashtra News Today 27 Dec:   मुंबई : कोरोना (Corona) महामारीने परत एकदा जगात कहर करायला सुरुवात केली आहे. कोरोनाचे ओमायक्रॉन (Omicron) प्रकार यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ब्रिटन (Britain), फ्रान्स (France), इटली (Italy)मध्ये रेकॉर्डब्रेक प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे. फ्रेंच शहरातील मर्से येथील रूग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. ज्युलियन कार्वेली यांनी सांगितले की, येथे दाखल झालेले बहुतांश रुग्ण हे असे आहेत की ज्यांना कोरोनाविरुद्ध लसीकरण करण्यात आलेले नाही. दरम्यान भारतातही ओमायक्रॉनचे रुग्णसंख्या वाढत आहे. दिल्ली आणि महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. 

1648 कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात ओमायक्रॉनबरोबरच कोरोनाच्या रुग्णसंख्येतही वाढच होताना दिसत आहे. 1648 नवे कोरोना रुग्ण आढळले आहे. यातील 31 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाल़े आहे. तर कोरोनाच्या उपचारानंतर 918 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या राज्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के एवढे झाले आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या सातशे ते आठशेपर्यंत नोंदवली जात असताना आता दुप्पट रुग्ण नोंद होऊ लागली आह़े, त्यामुळे कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

मुंबईतील कोरोना रुग्णवाढही चिंताजनक मानली जाते आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 922 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण 326 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे एकूण 4295 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत गेल्या 12 दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. मुंबईत तब्बल 922 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 14 डिसेंबरला हाच कोरोना रुग्णांचा आकडा 225 इतका होता. राज्यात आता ताज्या आकडेवारीनुसार एकूण 141 सक्रीय रुग्ण आहेत.  

हिवाळी अधिवेशनादरम्यान 32 जणांना कोरोना

मुंबईत विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान आतापर्यंत एकूण 32 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये पोलीस, सरकारी कर्मचारी आणि पत्रकारांचा समावेश आहे. या वाढत्या धोक्यामुळे राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान 4 पेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाही. तसेच नियमावलीनुसार काही निर्बंधही लावण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी