महाराष्ट्रात दोन दिवस लसीकरण स्थगित

को-विन अॅपच्या तांत्रिक समस्येमुळे महाराष्ट्रात १७ आणि १८ जानेवारी रोजी कोरोना लसीकरण होणार नाही.

COVID-19 vaccination suspended till 18th January in Maharashtra
महाराष्ट्रात दोन दिवस लसीकरण स्थगित 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात दोन दिवस लसीकरण स्थगित
  • को-विन अॅपच्या तांत्रिक समस्येमुळे दोन दिवस लसीकरण स्थगित
  • तांत्रिक समस्या दूर करुन ऑफलाइन डेटा ऑनलाइन नोंदवणार

मुंबईः को-विन अॅपच्या तांत्रिक समस्येमुळे महाराष्ट्रात १७ आणि १८ जानेवारी रोजी कोरोना लसीकरण होणार नाही. तांत्रिक समस्या दूर झाल्यानंतर लसीकरण सुरू होण्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. याआधी कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्याच दिवशी २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. संध्याकाळपर्यंत राज्यात १८ हजार ३३८ हून अधिक कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. संध्याकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरू होते. (COVID-19 vaccination suspended till 18th January in Maharashtra due to technical issues with CoWIN App)

पहिल्या दिवशी को-विन अॅपवर नोंदणी करण्यासाठी वेळ लागत होता. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र केंद्र सरकारने अॅपवर नोंदणीचे बंधन घातले आहे. तंत्रज्ञ महाराष्ट्रातील समस्या दूर करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात १७ आणि १८ जानेवारी या दोन दिवसांसाठी कोरोना लसीकरण स्थगित केले आहे. या कालावधीत ऑफलाइन केलेल्या सर्व नोंदी अॅपवर अपडेट केल्या जातील. अॅपवर माहिती नोंदवण्यास अडचणी येतात की नाही याची तांत्रिक तपासणी पूर्ण केली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याबाबतची घोषणा करणार आहे.

लस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती अॅपवर नोंदवली जात आहे. या माहितीचे विश्लेषण करुन कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात देशाला किती यश मिळाले याचा आढावा विशिष्ट कालावधीनंतर घेणे सोपे होणार आहे. तसेच आज लसचा पहिला डोस घेतल्यास दुसऱ्या डोससाठी कधी यायचे याची माहिती संबंधित व्यक्तीला दिली जाईल. तसेच त्या व्यक्तीला आठवण करण्यासाठी मेसेज पाठवणे सोपे जाणार आहे. याच कारणामुळे को-विन अॅपवर नोंदणी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. 

देशात सर्वाधिक कोरोनाबाधीत महाराष्ट्रात आहेत. याच कारणामुळे महाराष्ट्रात लसीकरण व्यवस्थित पार पडणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशात अनेक ठिकाणी अधून मधून माहिती नोंदवण्यासाठी वेळ लागत होता. अनेक राज्यांतील समस्या तंत्रज्ञांनी लक्षात आल्यावर लगेच उपाय करुन दूर केल्या. मात्र महाराष्ट्रात समस्या निर्माण झाल्यावर दिवसभरात लसीकरण ऑफलाइन नोंदणी करुन करण्यात आले. यामुळे केंद्र सरकारसाठी नेमकी आकडेवारी मिळवण्यात अडचणी आल्या. अखेर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील समस्या दूर करण्याला तातडीने प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आणि सर्व डेटा अपडेट करण्याचे आदेश दिले. 

ऑफलाइन केलेल्या नोंदी पुन्हा ऑनलाइन नोंदवण्यासाठी वेग लागेल. याच कारणामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यात १७ आणि १८ जानेवारी या दोन दिवसांसाठी कोरोना लसीकरण स्थगित केले आहे. या कालावधीत ऑफलाइन केलेल्या सर्व नोंदी अॅपवर अपडेट केल्या जातील. अॅपवर माहिती नोंदवण्यास अडचणी येतात की नाही याची तांत्रिक तपासणी पूर्ण केली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याबाबतची घोषणा करणार आहे.

संध्याकाळी ७ वाजेपर्यंतची लसीकरणाची आकडेवारी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) :

अकोला (२३८), अमरावती (४४०), बुलढाणा (५७५), वाशीम (१६७), यवतमाळ (३०७), औरंगाबाद (६४७), हिंगोली (२००), जालना (२८७), परभणी (३७१), कोल्हापूर (५७०), रत्नागिरी (२७०), सांगली (४५६), सिंधुदूर्ग (१६५), बीड (४५१), लातूर (३७९), नांदेड (२६२), उस्मानाबाद (२१३), मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१२६६), भंडारा (२६५), चंद्रपूर (३३१), गडचिरोली (२१७), गोंदिया (२१३), नागपूर (७७६), वर्धा (३४४), अहमदनगर (७८६), धुळे (३८९), जळगाव (४४३), नंदुरबार (२६५), नाशिक (७४५), पुणे (१७९५), सातारा (६१४), सोलापूर (९९२), पालघर (२५७), ठाणे (१७४०), रायगड (२६०).

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी