Corona Vaccination: 'या' ३ व्यक्तींना लस देण्यात येणार नाही

मुंबई
सुनिल देसले
Updated Jan 13, 2021 | 16:30 IST

Corona vaccination in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची तयारी झाली असून सीरम इन्स्टिट्यूटकडूनही लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. लसीकरण नेमकं कसं होणार आहे याबाबत आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली.

covid 19 vaccination
प्रातिनिधीक फोटो (फोटो सौजन्य: iStockimages) 

थोडं पण कामाचं

  • राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण
  • सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे ९ लाख ६३ हजार डोसेस प्राप्त 
  • केंद्र शासनाच्या सूचनेनुसार लसींचे जिल्हानिहाय वाटप करण्यात येणार

मुंबई : राज्यभरात कोरोना लसीकरणाची (Corona Vaccination) तयारी झाली आहे. लसीकरणासाठी सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute)कडून लस सुद्धा प्राप्त झाल्या आहेत. ही लसीकरणाची प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. जाणून घेऊयात काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे.

लस कोणाला देणार नाही?

आरोग्यमंत्री म्हणाले, लस कोणाला देऊ नये? तर लस सध्या १८ वर्षांखालील व्यक्ती, गरोदर महिला, तसेच कोणत्याही एॅलर्जी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार राज्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

घाबरून जाऊ नका, लस सुरक्षित आहे : आरोग्यमंत्री राजेश टोपे 

ही लस खूपच सुरक्षित आहे, कोरोना लसीची हजारो लोकांवर चाचणी करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. किरकोळ स्वरुपात अंग गरम होणे, काही सेकंद भुरळ येण्यासारख्या गोष्टी होऊ शकतात मात्र, हे खूपच सामान्य आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड योद्धांना प्राधान्य दिलेले असल्याने सर्व कोविड योद्धांनी जरुर लस घेऊन जनतेसमोर उदाहरण ठेवावे अशी विनंतीही यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे ९ लाख ६३ हजार डोसेस प्राप्त 

महाराष्ट्रात सीरम इन्स्टिट्यूटचे ९ लाख ६३ हजार डोसेस मिळाल्या आहेत तर भारत बायोटेकच्या २० हजार डोसेस प्राप्त झाल्या आहेत. कोविन अॅपवर पहिल्या टप्प्यात ७ लाख ८० हजार कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. एका व्यक्तीला दोन डोस द्यायचे असतात म्हणजेच आपल्याला अंदाजे १६ लाख डोस आपल्याला लागतील त्यापैकी १० टक्के वेस्टेज असतं म्हणजेच आपल्याला साधारणत: १७ लाख ५० हजार डोस लागतील. त्यापैकी आपल्याला ९ लाख ६३ हजार डोसेस मिळाले आहेत. सर्वांना एक-एक डोस देण्याऐवजी ज्याला डोस देत आहोत त्याला दोन्ही डोस पूर्ण देणार आहोत. या दोन डोसमधील अंतर चार आठवडे ते सहा आठवडे असं असणार आहे.

पंतप्रधान करणार लसीकरणाचा ऑनलाईन शुभारंभ

राज्यात उपसंचालक आरोग्य यांचे आठ सेंटर आहेत या सर्व ठिकाणी लसींचे डोसेस पाठवण्यात आलेले आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, लातूर, अकोला आणि नागपूर येथे डोसेस पाठवण्यात आले आहेत. १४ जानेवारीपर्यंत सर्व केंद्रांवर डोसेस पोहोचतील. १६ जानेवारी पंतप्रधान ऑनलाईन माध्यमातून लसीकरणाचा शुभारंभ करतील. राज्यामध्ये मुंबईतील कूपर हॉस्पिटल आणि जालन्यातील रुग्णालयात इंटरॅक्शन आणि लसीकरणाचा शुभारंभ होईल.

एका केंद्रावर १०० जणांना लसीकरण

आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यावरील विविध शासकीय आरोग्य संस्था स्तरावर व्यवस्था करण्यात येणआर असून एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठीच्या पथकात ५ सदस्यांचा समावेश असणार आहे अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रदान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी