महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली, एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण

मुंबई
Updated Mar 25, 2020 | 12:08 IST

 महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  सांगलीतल्या इस्लामपूर इथल्या एकाच कुटुंबातल्या 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

 COVID19 positive cases in Maharashtra rise to 112
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली, एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण  |  फोटो सौजन्य: BCCL

सांगलीः  महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  सांगलीतल्या इस्लामपूर इथल्या एकाच कुटुंबातल्या 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकट्या सांगलीत कोरोनाबाधितांची  संख्या नऊवर पोहोचली आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 112वर पोहोचली आहे.

धक्कादायक म्हणजे हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. हे कुटुंब इस्लामपूरमधील आहे. या कुटुंबातील आधीच चौघांना कोरोनाची लागण झाली होती. हे चौघे हज यात्रा करुन आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 112 वर पोहोचली.

हे चारही जण हजहून आले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबाला घरातच क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. संबंधित कोरोना बाधित रुग्णांना सौदी अरेबियातून आल्यापासून क्वारंटाईन सेंटरमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. त्या चौघांचे कोरोना अहवाल दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.  तसंच बसस्थानकावरून शहरात येणारा मुख्य रस्ता, गांधी चौक परिसरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले होते. त्यानंतर प्रशासानाने त्यांच्या कुटुंबाशी निगडीत 39 लोकांना इन्स्टिट्युटशनल क्वारंटाइन केलं होतं. प्रशासनाने सुमारे 250 लोकांना होमक्वारंटाइन केले होते. निगराणीखाली असलेल्या या 39 जणांपैकी 5 जणांचे रिपोर्ट आले असून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे.  हे लोक आणखी किती लोकांच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेतला जात आहे.  

सांगलीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यानं चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.  सांगलीतील या कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.


कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 41
पुणे – 19
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 9
कल्याण – 5
नवी मुंबई – 5
नागपूर – 4
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
ठाणे – 3
सातारा – 2
पनवेल – 1
उल्हासनगर – 1
वसई विरार – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1

एकूण 112

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...