कोरोना व्हायरस इतके दिवस कसा जिवंत राहतो?, IIT मुंबईच्या अहवालात खुलासा

Covid 19: संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र, कोरोना व्हायरस इतका वेळ जिवंत कसा राहतो? या संदर्भात माहिती समोर आली आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी याची माहिती दिली आहे. 

corona_update
प्रातिनिधीक फोटो (फोटो सौजन्य: iStockimages) 

मुंबई : आयआयटी मुंबई (IIT Mumbai)च्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात समोर आले आहे की, कोरोना व्हायरस (Coronavirus) इतके दिवस कसा जिवंत राहतो. कोरोना व्हायरस हा पातळ थरांना चिकटून पृष्ठभागावर जिवंत राहतो. हा घातक विषाणून कित्येक तास किंवा बरेच दिवस पृष्ठभागावर राहू शकतो. 'फिजिक्स ऑफ फ्लूइड्स'या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.

संशोधकांनी म्हटले की, विविध पृष्ठभागावरील कोरोना व्हायरस जिवंत राहण्याच्या संबंधित ही माहिती कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मदत करु शकते. त्यांनी पुढे म्हटले की, अलीकडेच करण्यात आलेल्या प्रयोगात असे आढळले आहे की, श्वासोच्छवास करताना निघालेले सामान्य कण काही सेकंदात कोरडे पडतात तर सार्स-कोव्ह२ व्हायरस(SARS-CoV2 virus) बराच काळ असल्याचं आढळून आलं.

...म्हणून कोरोना विषाणू अनेक तास जिवंत राहतो 

'लंडन व्हॅन डेर वॉल्स फोर्स' (London-van der walls forces)ने कशा प्रकारे नॅनोमीटर-लिक्विड थर पृष्ठभागावर कसे चिकटतात आणि त्यामुळे कोरोना विषाणू तासांपर्यंत जिवंत राहू शकतात याचा उल्लेख केला आहे. 'लंडन व्हॅन डेर वॉल्स फोर्स' ही एक डच वैज्ञानिक जोहनेस डिडेरिक व्हॅन डेर वॉल्स यांच्या नावावर तयार कऱण्यात आलेली अणू-रेणू यांच्यातील अवलंबन प्रक्रिया आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मुंबईचे प्रोफेसर अमि अग्रवाल म्हणाले, पातळ थर संक्रमणाचे आमचे मॉडेल असे दर्शवते की, पृष्ठभागावर पातळ द्रव थराची उपस्थिती किंवा सुकणे हे विषाणूंच्या एकाग्रतेच्या मापन प्रमाणेच तास आणि दिवसांच्या क्रमावर अवलंबून असते. धातूंच्या तुलनेत प्लास्टिक आणि काचेवर जिवंत राहण्याचा काळ अधिक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

कोरोना विषाणू दीर्घकाळ अस्तित्वात राहत असल्याने संक्रमित होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे संशोधकांनी म्हटले की, दरवाजा उघडताना किंवा हाताने ठेवलेल्या वस्तू, साधने, रुग्णालये तसेच इतर भागात विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे हे वारंवार निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी