मुंबईत दहिसरमध्ये पाळीव प्राण्यांचे  स्मशान

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 04, 2022 | 16:13 IST

crematorium for animal in dahisar mumbai : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये पाळीव प्राण्यांचे स्मशान तयार होत आहे. हे स्मशान ऑगस्ट २०२२ पासून कार्यरत होईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

crematorium for animal in dahisar mumbai
मुंबईत दहिसरमध्ये पाळीव प्राण्यांचे  स्मशान  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत दहिसरमध्ये पाळीव प्राण्यांचे  स्मशान
  • दहिसरमध्ये पाळीव प्राण्यांचे  स्मशान
  • स्मशानासाठी २५ लाख रुपयांची तरतूद

crematorium for animal in dahisar mumbai : मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये पाळीव प्राण्यांचे स्मशान तयार होत आहे. हे स्मशान ऑगस्ट २०२२ पासून कार्यरत होईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. या स्मशानात मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युतदाहिनी असेल. प्राण्यांसाठी विद्युतदाहिनीची सोय असलेली ही पहिलीच स्मशानभूमी असेल, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 

सर्व राजकीय पक्ष मतदारांसाठी काम करत असतात. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जसे माणसांवर प्रेम होते तशीच त्यांची प्राण्यांवर माया होती. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना माणूस आणि प्राणी यांच्याशी माणुसकीने वागायचे संस्कार दिले. दहिसरचे अभिषेक घोसाळकर आणि त्यांची पत्नी तेजस्विनी दजनहिताची कामं करताना प्राण्यांचा विचार केला. सातत्याने पाठपुरावा करून मुंबई मनपाच्या सहकार्याने दहिसर येथे प्राण्यांसाठी स्मशानभूमी विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणाला अनुकूल अशी तयार केली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात दहिसरमध्ये प्राण्यांच्या स्मशानाचे काम सुरू असल्याचे महापौर म्हणाल्या. 

प्राण्यांची स्मशानभूमी २५०० चौरसफूट जागेवर विकसित करण्यात येत आहे. मुंबई मनपाच्या सात विभागांमध्ये प्राण्यांसाठी स्मशानभूमीची योजना आहे. यापैकी दहिसर येथील काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात प्राण्याचा मृत्यू झाल्यास खादी ग्रामोद्योग त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतो. प्राण्यांसाठी खासगी स्मशानाची व्यवस्था आहे. पण मुंबई मनपाने अद्याप प्राण्यांसाठीच्या स्मशानाची व्यवस्था केली नव्हती. आता प्राण्यांच्या स्मशानाची व्यवस्था करण्यात आली आहे; अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी