पार्टी करून मित्रानेच केला महिलेवर बलात्कार 

मुंबई
Updated Nov 05, 2019 | 15:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

 मुंबईतील विविध ठिकाणी मौजमजा करून दोघे विक्रोळीला राहणाऱ्या एका मित्राच्या घरी गेले.पार्टी केल्यानंतर नशेत धुंद झालेल्या एका तरूणाने आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आपल्याच मैत्रीणीवर रेप केला.

crime news in marathi vikhroli friend rape his girl friend after party google news batmya
पार्टी करून मित्रानेच केला महिलेवर बलात्कार  

मुंबई :  मुंबईतील विविध ठिकाणी मौजमजा करून दोघे विक्रोळीला राहणाऱ्या एका मित्राच्या घरी गेले. त्या ठिकाणी पुन्हा पार्टी केली आणि दारूच्या नशेत धुंद झालेल्या एका तरूणाने आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आपल्याच मैत्रिणीवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने  मालाडमध्ये तक्रार दाखल केली, त्यानंतर हा गुन्हा विक्रोळीच्या पार्क साईट पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे. 

पोलिसांनी २६ वर्षीय आदित्य भौमिक या तरूणाला या प्रकरणी अटक केले आहे. तो वर्सोवा येथे वास्तव्याला आहे. एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये हा तरूण कामाला आहे. त्याची सहा महिन्यापूर्वी डिव्होर्स झालेल्या कामिनी ( नाव बदलेले आहे) या ३६ वर्षीय महिलेशी ओळख झाली. त्यांची खूप चांगली मैत्री झाली. शनिवारी लोअर परळ येथील फिनिक्स मॉल येथील एका कार्यक्रमाला गेले होते. त्यानंतर लोअर परळच्या एक पबमध्ये दोघांनी मौज मजा केली. 

लोअर परळ येथून दोघे विक्रोळी येथील वाधवा टॉवरमध्ये राहणाऱ्या एका मित्राच्या घरी पार्टी करण्यासाठी गेले. मध्यरात्री त्यांनी मित्राच्या घरी पार्टी केली. त्याच वेळी आदित्यने कामिनीवर बलात्कार केला. घडलेला प्रकार कामिनीने पहाटे घरी गेल्यावर आपल्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर मलाड येथील पोलीस ठाण्यात आई वडिलांसह जाऊन कामिनीने गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी हा गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्या विक्रोळी पार्क साईट पोलिस ठाण्याचा हद्दीत असलेल्या पोलिस ठाण्यात वर्ग केला.  सोमवारी सकाळी पोलिसांनी आदित्य भौमिक याला अटक केली. त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्याला येत्या ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी