या कारणामुळे झाली शिक्षिकेची हत्या, सहावीतील विद्यार्थ्याला घेतले ताब्यात....

सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात सोमवारी घडली.

crime news mumbai gowandi shivajinagar minor student kill lady teacher news in marathi
या कारणामुळे झाली शिक्षिकेची हत्या, सहावीतील विद्यार्थ्याला घेतले ताब्यात.... 
थोडं पण कामाचं
  • सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने केली खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेची हत्या
  • ही धक्कादायक घटना गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात सोमवारी घडली.
  • पैशावरून झालेल्या भांडणानंतर ही हत्या केली गेली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

मुंबई : सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात सोमवारी घडली. आयशा अस्लम हुसैया असे या ३० वर्षीय हत्या झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पैशावरून झालेल्या भांडणानंतर ही हत्या केली गेली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

तसेच, मुलाला पैशाचे आमिष दाखवून ही हत्या घडवून आल्याची चर्चा परिसरात आहे. परंतु अजूनही हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस हत्याच्या कारणाचा तपास करत असून अल्पवयीन मुलाशी बोलून या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहे. 

मुंबईतील गोवंडी भागातील शिवाजीनगर येथील देवनार डंम्पिंग ग्राऊंडजवळील वस्तीत राहणाऱ्या आयशा या सुफी इंग्रजी मिडीयममध्ये शिक्षिका आहेत. त्या या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा विवाह झाला असून त्यांना सात वर्षांचा मुलगा आहे. पण पतीपासून त्या विभक्त झाल्या आहेत.  शाळेनंतर त्या घरातच शिकवणी घेत होत्या. सुफी शाळेती विद्यार्थी आणि परिसरात राहणारे इतर विद्यार्थी त्यांच्याकडे खासगी शिकवणीला यायचे. सोमवारी रात्री आठ वाजण्याचा सुमारास शेवटची शिकवणी सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी निघून गेले. 

पण काही वेळाने सहावीत शिकणारा एका मुलगा पुन्हा आयशा यांच्या घरी आला. त्यावेळी बाथरूमध्ये तोंड धुणाऱ्या आयशा यांच्या पाढिवर धारदार चाकूने वार केले. काही कळण्याचा आत आयशा यांच्या पोटात आणि पाठीत सहा वेळा भोसकले. आयशा यांनी स्वतःच्या बचाव करण्यासठी बाहेर पळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना स्वतःला सावरता आले नाही आणि त्या घराच्या दरवाज्यातच कोसळल्या.  त्यांचा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी मदत केली. आयशा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या आणि विद्यार्थी घरातच बसून होता. आसपासच्या नागरिकांनी आयशा यांना सुरूवातीला राजावाडी आणि नंतर सायन हॉस्पिटलला हलवले. मात्र उपचारादरम्यान आयशा यांचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि आयशा यांच्या घराजवळच राहणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. घरात किराणा नसल्यामुळे आपल्या आईने आयशा यांच्याकडे पैसे घेण्यासाठी पाठवले, पण त्यांनी नकार दिल्याने आपण त्यांची हत्या केल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले. सध्या या अल्पवयीन मुलाची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. 

हत्येमागचे कारण शाळा? 

आयशा यांच्या वडिलांचीही काही वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. सुफी शाळेच्या मालकीवरून हा वाद असल्याची माहिती समोर येत आहे. याच कारणामुळे मालकी हक्काच्या वादामुळे काही जणांनी मुलाकडून ही हत्या घडवून आणली आणि आपल्या रस्त्यातील काटा काढल्याची चर्चा परिसरात होत आहे. दरम्यान, मुलानेही स्पष्ट माहिती न दिल्याने हत्येच्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी