Shiv Sena: 'आमदारांना मी सुद्धा डांबून ठेवू शकलो असतो, पण विकले गेलेले...', उद्धव ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

मुंबई
रोहित गोळे
Updated Sep 21, 2022 | 21:50 IST

Uddhav Thackeray Speech: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात भाषण करताना बंडखोर आमदारांवर तुफान टीका केली.

criticized the rebel mlas of shiv sena uddhav thackeray told story
'आमदारांना मी सुद्धा डांबून ठेवू शकलो असतो, पण...'  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरेंची बंडखोर आमदारांवर टीका
  • उद्धव ठाकरेंचा बंडखोर आमदार विकले गेल्याचा गंभीर आरोप
  • मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांवर बरसले

Shiv Sena Melava: मुंबई: शिवसेनेच्या (Shiv sena) मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. एवढंच नव्हे जे नगरसेवक शिंदे गटाच्या (Shinde Group) वाटेवर आहेत त्यांना देखील इशारा दिला आहे. यावेळी शिंदे गटात गेलेल्या आमदारांबाबत उद्धव ठाकरेंनी एक किस्साच यावेळी सांगितला. (uddhav thackeray criticized the rebel mlas of shiv sena)

'मध्ये-मध्ये बातम्या येत आहेत की, शिवसेनेचे काही नगरसेवक जाणार. जा आत्ता निघून जा. दारं उघडा आणि निघून जा. हेच मी आमदारांच्या सोबत केलं होतं. ज्यावेळेला गद्दार सुरतेकडे पळत होते तेव्हा 30-40 आमदार माझ्यासोबत वर्षावर बसले होते. मी सुद्धा त्यांना डांबून ठेवून शकलो असतो. पण विकली गेलेली माणसं माझी म्हणून किती काळ मी ठेवू शकतो. ज्यांनी इमान विकलेलं आहे. जी बेमान माणसं इमानदारीचा बुरखा घालून किती काळ माझ्यासोबत राहतील?' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आपण स्वत:च जा असं म्हटल्याचं सांगितलं. 

अधिक वाचा: 'बाप पळवणारी टोळी महाराष्ट्रभर फिरतेय', शिंदेंना टोमणा

उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण... 

'मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्वत: पंतप्रधान उतरतायेत'

'जे बोलतो ते आम्ही करतो.. आता पुढच्या आठवड्यात कदाचित पंतप्रधान येत आहेत मुंबईत. म्हणजे यावेळी लढाई कशी होईल याचा विचार घ्या. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्वत: पंतप्रधान उतरतायेत. केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. गृहमंत्री तर आहेतच. आपले गद्दार आहेतच. मुन्ना भाई आहेत. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार.' 

अधिक वाचा: "फडणवीसांच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक" 

'मर्द असतो तो याच लढाईची वाट पाहत असतो आणि आम्ही त्याच लढाईची वाट बघतोय. म्हणून.. तुम्हाला मी विचारतोय. जे वातावरण आहे ते पाहून तुम्ही घाबरला आहात का? फक्त तूम आगे बढो हम तुम्हारे साथ नही... तर काही काळ तरी संघर्षाच्या वाटेवर चालण्याची तुमच्यात तयारी आहे का?' असा सवाल विचार उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.

'मी अमित शाहांना आव्हान देतोय की...'

'...म्हणून मी अमित शाहांना आव्हान देतोय की, तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाही. तुम्ही हिंदू-मुसलमान करुन बघा.. आज मुसलमान लोक सुद्धा शिवसेनेसोबत आहेत. कारण कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री म्हणून मी या लोकांचे प्राण वाचवले आहेत. 92-93 साली सुद्धा देशद्रोह्यांनी थैमान घातलं होतं. तेव्हा कित्येक शिवसैनिकांनी दर्ग्याचं सुद्धा रक्षण केलंय. हीच तर शिवाजी महाराज, माझ्या आजोबांची, वडिलांची मला शिकवण आहे.' 

'मात्र, तुमची जी शाह निती आहे त्यावर मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. पण ती यशस्वी होणार नाही. म्हणून मी शाहांना आव्हान देतोय. तुमचे जे चेले-चपाटे जे इथे बसले आहेत ना त्यांना सांगा की, मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा. तसंच हिंमत असेल तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक देखील लावून दाखवा. हिंमत असेल तर या समोर.' असं थेट आव्हानच उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना आव्हान दिलं आहे.

अधिक वाचा: मुंबई संकटात असताना ही गिधाडं कुठे असतात,उद्धव ठाकरेंचा सवाल

'मी पण आमदार डांबून ठेवू शकलो असतो...'

'पण आजपासून तुम्ही सुद्धा जागते राहा. ज्या मध्ये-मध्ये बातम्या येत आहेत की, शिवसेनेचे काही नगरसेवक जाणार. जा आत्ता निघून जा. दारं उघडा आणि निघून जा. हेच मी आमदारांच्या सोबत केलं होतं. ज्यावेळेला गद्दार सुरतेकडे पळत होते तेव्हा 30-40 आमदार माझ्यासोबत वर्षावर बसले होते. मी सुद्धा त्यांना डांबून ठेवून शकलो असतो. पण विकली गेलेली माणसं माझी म्हणून किती काळ मी ठेवू शकतो. ज्यांनी इमान विकलेलं आहे. जी बेमान माणसं इमानदारीचा बुरखा घालून किती काळ माझ्यासोबत राहतील?'

'मी त्यांना सांगितलं दारं उघडी आहेत. कारणं सांगू नका.. जा निघून जा. गेट आऊट.. तेच मी सांगतोय.. एक जरी माणूस फुटायचा असता तर आजपर्यंत फुटला असता. पण एवढी गर्दी करुन इकडे तुम्ही का बसला आहात.. शिवसेना आज पहिल्यांदा फुटलीय अशातला भाग नाही. ज्यांनी फोडली ते संपले. मोठे झालेले फुटले.. म्हणून ही घाबरुन जाण्याची वेळ नाही. मी तर म्हणेल ही आपल्या आयुष्यातील सुवर्णसंधी आहे. बाळासाहेबांना अभिमान वाटला पाहिजे की, मी उभा केलेला शिवसैनिक मर्द आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी