Ajit Pawar on Loss of farmers: शेतकऱ्यांचा घास हिरावला गेला; शेतकऱ्यांना तातडीने मदत करा- अजित पवार

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 08, 2023 | 10:52 IST

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. अधिवेशनला सुरुवात होण्यापूर्वी  विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारचे कान टोचत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.

Help the farmers urgently - Ajit Pawar
शेतकऱ्यांना तातडीने मदत करा- अजित पवार   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • धुळवडीत नेते सहभागी असल्यामुळे सरकारला अजून नुकसानीचा अंदाज आला नसावा
  • राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक मदतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार
  • एनडीआरएफच्या निकषाच्यापुढे जाऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. अधिवेशनला सुरुवात होण्यापूर्वी  विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारचे कान टोचत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळे (Rain)राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचं  मोठे नुकसान झाले आहे.  शेतकऱ्यांच्या  हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. त्यामुळे आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी केली.  शेतकऱ्यांना (Farmers) आश्वासन मिळालं मात्र, अद्याप मदत मिळाली नसल्याचे अजित पवार म्हणाले. शेतकऱ्याचं दु:ख पाहवत नसल्याचे अजित पवार म्हणाले. (crops loss due to unseasonal rain; Help the farmers urgently - Ajit Pawar)

अधिक वाचा  : आंतरराष्ट्रीय महिला दिनी माई, ताईला द्या शुभेच्छा

अधिवेशनाला जाण्यापूर्वी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिंदे-फडणीस सरकारवर टीका केली.  काल धुळवडीत नेते सहभागी असल्यामुळे सरकारला अजून नुकसानीचा अंदाज आला नसावा असा टोला त्यांनी मारला.  आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक मदतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे शेतकरी प्रश्नावर सभागृहात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या आठवड्यात कांद्या प्रश्नावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.

शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, सभागृहात मागणी करणार

अजित पवार म्हणाले, एनडीआरएफच्या निकषाच्यापुढे जाऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली का विचारले?  परंतु मागची मदत अजून मिळाली नसल्याच शेतकऱ्यांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणालेत. यावरुन ते शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडतील. 

अधिक वाचा  : जाणून घ्या महिलादिनचं राशीभविष्य; कसा असेल आजचा दिवस

सहा मार्च ते नऊ मार्च यादरम्यान राज्यातील हवामान बदलले जाईल आणि त्यामुळं अवकाळी पाऊस आणि गारपीट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणं राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हरभरा, गहू, मका, ज्वारी, द्राक्ष, भाजीपाला, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळं आज आम्ही विरोधीपक्षांच्यावतीने शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

अधिक वाचा  : आंतरराष्ट्रीय महिला दिन शुभेच्छा करा शेअर

 बळीराजा चिंतातूर झाला आहे

सरकारला अजूनही नुकसानीचा अंदाज आलेला दिसत नाही. धूलिवंदन, होळी असल्यामुळं बरेच मान्यवर नेते त्यामध्ये गुंतलेले होते. महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा सण आहे. आनंद लुटला पाहिजे. पण त्याचवेळी महाराष्ट्रातील बळीराजा चिंतातूर झाला आहे. शेतकरी खचून गेला आहे. त्याला उभारी देण्याचं काम राज्य सरकारनं करावं असे अजित पवार म्हणाले. विशेषत रब्बी पिकांचं मोठ नुकसान झालं आहे. जिथं शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं आहे, तिथं नियमांच्या बाहेर जाऊन मदत करावी असे अजित पवार म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी