Cruise Drugs Case : आतापर्यंत 14 जणांची चौकशी, प्रभाकर साईलची पुन्हा चौकशीची शक्यता: ज्ञानेश्वर सिंह

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 12, 2021 | 19:03 IST

Cruise Drugs Case : मुंबई क्रुझ पार्टी (Cruise Drugs Case) प्रकरणी आतापर्यंत 14 जणांची चौकशी करण्यात आली आहे. प्रभाकर साईलची (Prabhakar Sail) दोनवेळा चौकशी करण्यात आली आहे.

Cruise Drugs Case: 14 interrogated so far
Cruise Drugs Case : आतापर्यंत 14 जणांची चौकशी  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • वेळेपडल्यास गोसावीची चौकशी केली जाणार - ज्ञानेश्वर सिंह
  • आतापर्यंत 14 ते 15 जणांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्वांना गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल.

Cruise Drugs Case : मुंबई: मुंबई क्रुझ पार्टी (Cruise Drugs Case) प्रकरणी आतापर्यंत 14 जणांची चौकशी करण्यात आली आहे. प्रभाकर साईलची (Prabhakar Sail) दोनवेळा चौकशी करण्यात आली आहे. गरज पडल्यास साईलसह इतरांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असं एनसीबी (NCB) चे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह (Deputy Director Dnyaneshwar Singh) यांनी सांगितले.

ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन क्रुझ पार्टी प्रकरणातील तपासाची माहिती दिली. याप्रकरणी आम्ही काही कागदपत्रे जमा केली आहेत. आमची टीम क्राईम सीनवर जाऊन आली. घटना कशी घडली ते समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आतापर्यंत 14 ते 15 जणांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्वांना गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल. प्रभाकर साईललादेखील बोलावलं जाईल, असं ते म्हणाले. 

मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांचं सहकार्य मिळणार आहे. देशाला नशामुक्त करण्यासाठी एनसीबीच्या कामात सहकार्य करण्याचं आश्वासन मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दिले आहे, असे सिंह म्हणाले. काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. काही मिळायचे बाकी आहेत, असेही ते म्हणाले. ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यालाच प्राधान्य दिले आहे. ही केस आव्हानात्मक आहे. आम्हाला लवकर चौकशी करायची आहे. काही साक्षीदारांची अजून चौकशी करायची आहे. त्यानतंर काही निष्कर्ष काढू. प्रभाकर साईल या मुख्य साक्षीदाराने साक्ष दिली आहे. त्याची दोनदा चौकशी केली आहे. पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या वेगाने चौकशी सुरू आहे, त्यावर आम्ही समाधानी आहोत.

आता चौकशी कधी पूर्ण होईल ते आताच सांगू शकत नाही. कारण चौकशी सुरू आहे. डेटा अॅनालाईज करायचा आहे. त्याचं लिंकिंग करायचे आहे. त्यानंतरच काही तरी निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. केपी गोसावीला ताब्यात घेणार का? असा सवाल करण्यात आला असता गोसावीचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात अर्ज दिल्याचं त्यांनी सांगितलं. गोसावी प्रकरणी कोर्टात अर्ज दिला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी आहे. सध्या गोसावी पोलीस कोठडीत आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी