क्रूझ ड्रग्ज प्रकरण : नवाब मलिकांनी शेअर केली गोसावी आणि काशिफ खानची whatsapp चॅट; म्हणाले, काशिफ खानची चौकशी का नाही?

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 16, 2021 | 11:36 IST

Cruise Drugs Case: क्रूझ पार्टी प्रकरणानंतर (Cruise Drugs Party Case) महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण चांगलेच तापले आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणापासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली आहे.

Nawab Malik shared Gosavi and Kashif Khan's whatsapp chat
नवाब मलिकांनी शेअर केली गोसावी आणि काशिफ खानची whatsapp चॅट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नवाब मलिककांकडून के.पी गोसावी आणि एका दिल्लीच्या व्यक्तीच्या संभाषणाचं व्हॉट्सअप चॅट पोस्ट
  • काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यातील संबध काय? - मलिकांचा प्रश्न
  • काशिफ खानला प्रश्न का विचेरले जात नाहीत - नवाब मलिक

Cruise Drugs Case:  मुंबई: क्रूझ पार्टी प्रकरणानंतर (Cruise Drugs Party Case) महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण चांगलेच तापले आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणापासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली आहे. समीर वानखेडे यांच्या कारवाईवर मलिक यांनी सातत्याने आक्षेप घेत पुरावे सादर केले आहेत. मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीने अटक केली होती. एनसीबीने केलेली अटक ही बोगस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली होती.

पत्रकार परिषदांमधून मलिकांनी समीर वानखेडे आणि भाजपावर सातत्यानं निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत आज पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. नवाब मलिक यांनी के.पी गोसावी आणि एका दिल्लीच्या व्यक्तीच्या संभाषणाचं व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे तसेच पुन्हा एकदा काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्या संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.  अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे, के. पी गोसावी आणि काशिफ खान यांच्यावर निशाणा साधला. ट्विटमध्ये त्यांनी गोसावी आणि एका व्यक्तीमध्ये काशिफ खान संदर्भात झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये मलिक म्हणतात की, हे आहे के.पी. गोसावी आणि खबरी यांच्यामध्ये काशिफ खानबद्दल झालेलं संभाषणाचं व्हॉट्सअप चॅट. काशिफ खानला प्रश्न का विचेरले जात नाहीत. काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यातील संबध काय? असे प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे,  मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी सातत्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. तसेच वानखेडे यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचाही आरोप केला. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी