Green Station: सीएसएमटी बनले 'हरित स्थानक', IGBCकडून सुवर्ण प्रमाणपत्र मिळवणारे पहिले रेल्वेस्थानक

ग्रीन स्टेशन (हरित स्थानक) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे महाराष्ट्रातील आयजीबीसी (इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल) कडून सुवर्ण प्रमाणपत्र मिळवणारे पहिले रेल्वेस्थानक 

CSMT railway station awarded Gold certification from IGBC
सीएसएमटी बनले 'हरित स्थानक', IGBCकडून सुवर्ण प्रमाणपत्र मिळवणारे पहिले रेल्वेस्थानक 

मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकाला जे महाराष्ट्रातील पहिले रेल्वे स्थानक आहे ज्याला भारतीय उद्योग संघटनेच्या  इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या (आयजीबीसी) रेटिंगनुसार सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात येत आहे. संजीव मित्तल, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, श्री शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई आपल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकासह आयजीबीसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री गुरमितसिंग अरोरा यांच्याकडून आयजीबीसीचे प्रमाणपत्र स्वीकारले. (CSMT railway station awarded Gold certification from IGBC)

हे प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल संजीव मित्तल यांनी हरित उपक्रम राबविण्याच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांसाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि त्यांना मध्य रेल्वे क्षेत्रामध्ये अशा उपाययोजना करण्यास प्रोत्साहित केले. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सुवर्ण प्रमाणपत्र देऊन त्यांच्या प्रयत्नांना मान्यता दिल्याबद्दल त्यांनी आयजीबीसी टीमचे आभार मानले.

मध्य रेल्वेने आपल्या कार्यक्षेत्रात विविध हरित उपक्रम राबविले आहेत, ज्यात वृक्षारोपणाद्वारे हरित क्षेत्रे तयार करणे, सौर पॅनेल बसविणे, अनेक स्थानकांवर ग्राहक अनुकूल उपक्रम राबविणे, एलईडी बल्ब आणि दिवे इत्यादींचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आपल्या स्थानकांवर विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अनेक हरित व प्रवासी अनुकूल उपक्रम राबविण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकांला आयजीबीसी ग्रीन प्रमाणपत्र प्राप्त करण्यास सक्षम करणारी काही उत्कृष्ट ग्रीन बिल्डिंग आणि प्रवासी अनुकूल वैशिष्ट्ये अशी आहेतः

  1. स्थानक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासी अनुकूल बनविण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
  2. पार्किंगच्या ठिकाणी इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रोत्साहित करण्यासाठी काही पार्किंगच्या जागांवर इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट्स
  3. स्थानकाच्या एकूण क्षेत्राच्या 15% पेक्षा जास्त भागात झाडे आणि लहान उद्याने व्यापलेली आहेत. लँडस्केप क्षेत्र, लॉन इ. सेंद्रिय खतासह देखभाल केली जाते.
  4. सौर पॅनेल: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक साइटवर २४५ किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेल स्थापित केले आहेत
  5. स्थानकातील दिवे 100% एलईडी फिक्स्चरसह बदलले आहेत
  6. विविध कार्यालये आणि प्रतीक्षालयांमध्ये 17 ओक्युपेंसी सेन्सर स्थापित केले आहेत
  7. ऊर्जा कार्यक्षम बीएलडीसी आणि एचव्हीएलएस पंखे विविध ठिकाणी लावले आहेत.
  8. यांत्रिकी सफाई कॉन्ट्रॅक्ट ज्यात प्लॅटफॉर्म, सभोवतालचे क्षेत्र, पार्किंगची ठिकाणे, ट्रॅक, छत, शटर, वेटिंग हॉल इत्यादींवर लक्ष केंद्रित केले जाते. कंत्राटदारांनी वापरलेली रसायने बायो-डिग्रेडेबल आणि इको-फ्रेंडली आहेत (ग्रीन प्रो)
  9. वायफाय, स्वयंचलित तिकिट विक्री यंत्रे, पर्यटन माहिती व बुकिंग सेंटर, फूड कोर्ट, औषधे  आणि वैद्यकीय सुविधा इ. सारख्या स्मार्ट प्रवासी सुविधा
  10. प्लास्टिक बंदीसाठी उपाय. “प्लास्टिक पिशव्याचा वापर टाळा” असे लिहिलेले फलक, आणि प्लास्टिकच्या पिशव्याच्या पर्यावरणीय परिणामांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी डिजिटल डिस्प्ले प्रदर्शित केले आहेत.

रेटिंग सिस्टम उर्जा कार्यक्षमता, जलसंधारण, कचरा उपाययोजना हाताळणे आणि इमारती आणि त्या पर्यावरणासाठी हिरव्या मानकांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणे यासारख्या राष्ट्रीय प्राथमिकतेस उत्तेजन देते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी