Cyclone Mandous: मंदोसमुळे महाराष्ट्रावर अस्मानी संकट,अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 09, 2022 | 14:51 IST

चक्रीवादळ (Cyclone ) तमिळनाडूच्या किनारपट्टीला (coast) धडकणार असल्यामुळे 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरातलाही फटका बसण्याची शक्यता आहे.

unseasonal rain possibility in many districts of Maharashtra
तामिळनाडूतील मंदोसमुळे महाराष्ट्रावर अस्मानी संकट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता.
  • चक्रीवादळ तमिनाळाडूच्या किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.

Cyclone Mandous: बंगालच्या उपसागरातील (Bay of Bengal) कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हवामान विभागाने (Department of Meteorology) याला मंदोस चक्रीवादळ (Cyclone Mandous) असे नाव दिले आहे. या चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडील राज्यांना जास्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, मुंबई आणि ठाणेसह इतर उपनगरामध्ये 12 डिसेंबर रोजी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  (Cyclone Mandous: unseasonal rain possibility in many districts of Maharashtra) 

अधिक वाचा  : हुशार डोक्याची माणसं अवघ्या 11 सेंकदात शोधतील पोरगी

दरम्यान, चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरातलाही फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी भाकीत केले आहे की 'मंदोस चक्रीवादळ' शुक्रवारी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दुपारनंतर या चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. 
 अधिक वाचा  : मोरबीत BJP उमेदवार जिंकला, पूल दुर्घटनेनंतरही कसा झाला विजय?

मुंबईत पावसाची शक्यता 

तमिळनाडू आलेल्या चक्रीवादळामुळे पुढील आठवड्याची सुरुवात मुंबईमध्ये हलक्या पावसाच्या हालचालींसह होण्याची शक्यता आहे. आयएमडीने आपल्या पाच दिवसांच्या जिल्ह्याच्या अंदाजात म्हटले आहे की 12 डिसेंबर रोजी मुंबईच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

 कुठे कुठे पडणार पाऊस ?

मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12, 13, 14 आणि 15 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मुंबई ,पुणे ,ठाणे, रायगड  आणि गोव्याच्या किनाऱ्याजवळ वादळ पुन्हा आले आहे.

 त्याचा प्रभाव पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी