मुंबईत गॅस सिलिंडरचा स्फोट, १० जखमी

मुंबई
Updated May 21, 2019 | 22:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. तब्बल तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असून त्यानंतर आग लागली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि रुग्णावाहिका दाखल झाली आहे.

cylinder blast mumbai
मुंबईत गॅस सिलिंडरचा स्फोट (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई: गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना मुंबईतील जोगेश्वरी परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेत १० जण जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. हनुमान चाळीत हा गॅस सिलिंडर स्फोट झाला असून जखमींना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जोगेश्वरीतील बेहरामबाग परिसरात असलेल्या विकास नगरमधील हनुमान चाळीत हा सिलिंडर स्फोट झाला आहे. सायंकाळी ८.४७ च्या सुमारास या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणली. या घटनेत १० जण जखमी झाल्याचं वृत्त एएनआय न्यूज एजन्सीने दिलं आहे. या संदर्भात एएनआयने ट्विटही केलं आहे.

सर्वच्या सर्व १० जखमी नागरिकांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, गॅस सिलिंडरचा स्फोट नेमका कसा झाला आणि एकदम तीन गॅस सिलिंडरचा स्फोट कसा झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. 

दादरमध्ये आगीत होरपळून मुलीचा मृत्यू

दादर येथील पोलीस वसाहतीत काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आगही लागली. या दुर्घटनेत एका १५ वर्षीय तरुणीचा होरपळून मृत्यू झाला होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मृत तरुणी एकटीच घरात होती तर तिचे आई-वडील लग्नाला गेले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मुंबईत गॅस सिलिंडरचा स्फोट, १० जखमी Description: मुंबईतील जोगेश्वरी परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. तब्बल तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असून त्यानंतर आग लागली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि रुग्णावाहिका दाखल झाली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles