मुंबईत पुन्हा डी गँग कार्यरत; नामांकित बिल्डरला धमकी, छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटला एनआयएकडून अटक

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 05, 2022 | 07:27 IST

मुंबईतून (Mumbai) एक मोठी बातमी समोर आली आहे. एनआयएने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन (underworld don ) दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) हस्तक छोटा शकीलचा (Chota Shakeel) मेव्हणा (Brother-in-law)सलीम कुरैशी उर्फ सलीम फ्रूटला (Salim Qureshi alias Salim Fruit) अटक केली आहे. एका नामांकित बिल्डरला (Builder) धमकी दिल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

Shakeel's brother-in-law Salim Fruit arrested by NIA
शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटला एनआयएकडून अटक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रीय तपास यंत्रणेने सकाळी गँगस्टर छोटा शकीलचा साथीदार सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट याला मुंबईत ताब्यात घेतले.
  • माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या डी कंपनीशी संबंधित व्यवहार प्रकरणी एनआयएने सलीम फ्रुटची चौकशी केली होती.
  • एका नामांकित बिल्डरला धमकी दिल्याप्रकरणी सलीम फ्रूटला अटक

मुंबई : मुंबईतून (Mumbai) एक मोठी बातमी समोर आली आहे. एनआयएने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन (underworld don ) दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) हस्तक छोटा शकीलचा (Chota Shakeel) मेव्हणा (Brother-in-law)सलीम कुरैशी उर्फ सलीम फ्रूटला (Salim Qureshi alias Salim Fruit) अटक केली आहे. एका नामांकित बिल्डरला (Builder) धमकी दिल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. डी कंपनीच्या कारवायांशी संबंधित प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. 3 फेब्रुवारी रोजी दहशतवादी किंवा गुन्हेगारी कारवायांशी संबंधित डी गँगविरुद्धात खटला दाखल करण्यात आला होता.

“डी कंपनीचा जवळचा सहकारी सलीम फ्रूट याने डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांना चालना देण्यासाठी दहशतवादी निधी उभारण्यासाठी मालमत्ता व्यवहार आणि वाद मिटवण्याद्वारे छोटा शकीलच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात सक्रिय भूमिका बजावली होती,” एनआयएने म्हटले आहे. मुंबई आणि लगतच्या ठाणे जिल्ह्यात २० हून अधिक ठिकाणी छापे टाकून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सकाळी गँगस्टर छोटा शकीलचा साथीदार सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट याला मुंबईत ताब्यात घेतले. केंद्रीय एजन्सीने असेही म्हटले आहे की त्यांनी अनेक गुन्हेगारी कागदपत्रे जप्त केली आहेत.

Read Also : CWG2022 : सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंग मिळवलं पहिलं सुवर्णपदक

विशेष म्हणजे माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या डी कंपनीशी संबंधित व्यवहार प्रकरणाच्या आरोपांप्रकरणी एनआयएने सलीम फ्रुटची चौकशी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरैशीने मुंबईतील एका नामांकित बिल्डरला धमकी दिली होती. त्या प्रकरणात फ्रुटला अटक करण्यात आली आहे. सलीमने दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीसच्या नावाने धमकी दिली होती. तसेच त्याने बिल्डरकडे त्याच्या सुरू असलेल्या एका प्रोजेक्टमधील दोन फ्लॅटची डिमांड केलेली होती. 

Read Also : Commonwealth Games 2022 : लॉन्ग जंपमध्ये श्रीशंकरनं पटकावलं

संबंधित नामांकित बिल्डरने घाबरुन सलीमची ती मागणी पूर्ण केली होती. बिल्डरने आपल्या सुरू असलेल्या प्रोजेक्टमधून दोन फ्लॅट सलीमला दिले होते. पण त्यानंतर सलीमची आणखी हिंमत वाढली. त्याने पुन्हा बिल्डरला धमकी देण्यास सुरुवात केली. तो बिल्डरकडे संबंधित प्रोजेक्टमध्ये आर्धी पार्टनर्शीप मागू लागला. तो बिल्डरला यासाठी प्रचंड त्रास देत होता. अखेर एनआयएला याबाबतची माहिती मिळाली. विशेष म्हणजे एनआयएने त्याआधीच सलीम कुरैशी याच्याविरोधात डी कंपनीशी संबंधित आणि त्याच्या काळ्या कूकृत्यांप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाच्या तपासानंतर एनआयएने सलीमला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक केली.

Read Also : न्यायमूर्ती उदय ललित होणार भारताचे 49 वे सरन्यायाधीश

एनआयएने तस्करी, अंमली पदार्थ-दहशतवाद, मनी लाँड्रिंग, बनावट चलन प्रसारित करणे, अनधिकृत ताबा ठेवणे, दहशतवादी निधी उभारण्यासाठी महत्त्वाच्या मालमत्तेचे संपादन करणे आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या सक्रिय सहकार्याने काम करणे यासारख्या दहशतवादी किंवा गुन्हेगारी कृतींशी संबंधित गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी 12 मे रोजी एनआयएने या प्रकरणी दोघांना अटक केली होती. कुरेशी हा दाऊदची टोळी डी कंपनीच्या जवळचा सहकारी असल्याचा आरोप आहे. त्याने मालमत्ता व्यवहार आणि विवाद सेटलमेंटद्वारे छोटा शकीलच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात सक्रिय भूमिका बजावली होती. एनआयएने सांगितले की या पैशाचा वापर डी कंपनीच्या कारवायांसाठी दहशतवादी निधी उभारण्यासाठी केला गेला.

कोण आहे हा सलीम फ्रुट?  तुम्हाला माहिती असणे आहे आवश्यक

तर सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट हा दाऊद इब्राहिमचा गुंड असलेला गँगस्टर छोटा शकीलचा मेहुणा आहे. फळांची विक्री करत असल्याने त्याला सलीम फ्रूट म्हणून ओळखले जाते. दरम्यान फळांची विक्री करणं हा  त्याचा कौटुंबिक व्यवसाय असून दक्षिण मुंबईत फळे विकण्याचे त्याचे दुकान आहे, तो दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी देखील मानला जातो तर छोटा शकील हा गुंड आणि कॉन्ट्रॅक्ट किंवा सुपारी किलर आहे जो त्याच्या गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवत असे. शकील दाऊद इब्राहिमसाठी पाकिस्तानातून काम करत असल्याचा आरोप आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सलीम फ्रूटने पाकिस्तानातील छोटा शकीलच्या घरीही तीन ते चार वेळा भेट दिली होती.

सलीम फ्रूट विरुद्ध इतर खटले:

सलीम कुरेशीवर 2000 च्या सुरुवातीला शकील आणि इब्राहिमसाठी परदेशात खंडणीचे रॅकेट चालवल्याचा आरोप होता आणि 2006 मध्ये यूएई सरकारने त्याला भारतात पाठवले होते.  छोटा शकीलशी संबंधित खंडणीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) आरोप ठेवण्यात आले होते आणि 2010 पर्यंत तो तुरुंगात होता.

नंतर, 2016 मध्ये, मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी सेलने त्याला 2004 मधील एका प्रकरणाच्या संदर्भात पुन्हा अटक केली. डॉक्टरकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. सलीम फ्रूटच्या साथीदारांनी मध्य मुंबईतील एका डॉक्टरला धमकावून त्याच्याकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. वाटाघाटीनंतर रक्कम 10 लाखांवर ठरली आणि पैसे घेण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने रंगेहाथ अटक केली.

Read Also : महाराष्ट्रात १२०७७ कोरोना Active, आज १८६२ रुग्ण, ७ मृत्यू

त्यानंतर केंद्रीय एजन्सीने मुंबईतील नागपाडा परिसर, भेंडीबाजार, सांताक्रूझ, माहीम, मुंबईतील गोरेगाव भागात, ठाण्यातील मुंब्रा आणि इतर ठिकाणी दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर छापे टाकले. यात इब्राहिमशी अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज विकणारे कथितपणे संबंधित असलेले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या वर्षी फेब्रुवारीमध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीचा एक भाग म्हणून कुरेशीची चौकशी केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी