Dahi Handi 2022: शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केल्यापासूनच शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. हा संघर्ष इतका वाढला की, दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता शिवसेनेत बंडखोरी झाल्यावर शिंदे गटाने भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केल्यावर ठाकरे विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा संघर्ष सुरू झाला आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. मात्र, आगामी मनपा निवडणुका लक्षात घेता ठाकरेंकडून पक्ष मजबूत करण्यासाठी सुरुवात केली आहे. पण असे असताना आता आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच भाजपने बाजी मारल्याचं दिसून येत आहे. (Dahi Handi 2022 BJP entry in Aaditya Thackeray assembly Constituency ashish shelar said jambori maidan to jhanki hai picture abhi baki hai)
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन करण्यात येत असतं. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत दहीहंडी आयोजित करुन भाजपने बाजी मारली आहे. वरळीतील जांबोरी मैदानात सचिन अहिर हे मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे आयोजन करत होते. मात्र, यंदाच्या वर्षी या मैदानात भाजपने दहीहंडीचं आयोजन केलं आहे.
वरळी हा शिवसेनेचा गड मानला जातो मात्र, आता त्या ठिकाणी भाजपने एन्ट्री घेतली आहे. वरळीत दहीहंडी कुठे आयोजित करायची? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आणि त्यानंतर आता पर्यायी जागा म्हणून शिवसेनेकडून श्रीराम मिलच्या चौकात दहीहंडीचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.
अधिक वाचा : Maharashtra: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारचं मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ
गड कुणाचा कोणी ठरवला? @AUThackeray वरळीतून निवडून आलेत त्यामध्ये भाजपाची पण मते आहेत... pic.twitter.com/sbyZ4GvT8t — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 17, 2022
या संदर्भात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं, "गड कुणाचा आणि कुणी ठरवला? गडावर ठरणं आणि ठरवणं हे शेलार मामांच्या व्यतिरिक्त कोण करू शकतं. त्यामुळे गड वगैरे त्यांचा आम्ही मानत नाही. स्वत: आदित्य ठाकरे निवडून आले आहेत ते भाजपच्या मतांवर निवडून आले आहेत. भाजपकडून ३२७ दहीहंडी आयोजनांचं काम करत आहे. पक्षाच्या वतीने आम्ही विमा कवच दिला आहे. संपूर्ण मुंबईभर आम्ही कार्यक्रम करत आहोत. जांभोरी मैदान तो झांकी है अभी बहोत कुछ बाकी है. मनपा निवडणुकीच्या कार्यक्रमाला आम्ही आधिच लागलो आहोत."
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.