Iqbal Kaskar: दाऊदचा भाऊ इकबाल कासकरविषयी मोठी बातमी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 21, 2022 | 18:29 IST

Dawood Ibrahims brother Iqbal Kaskar admitted to JJ hospital in Mumbai after chest pain : भारतात मोस्ट वाँटेड असलेला फरार आरोपी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याच्याविषयीची एक मोठी बातमी.

Dawood Ibrahims brother Iqbal Kaskar admitted to JJ hospital in Mumbai after chest pain
दाऊदचा भाऊ इकबाल कासकरविषयी मोठी बातमी  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • दाऊदचा भाऊ इकबाल कासकरविषयी मोठी बातमी
  • इकबाल कासकर याला मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले
  • छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर इकबाल हॉस्पिटलमध्ये दाखल

Dawood Ibrahims brother Iqbal Kaskar admitted to JJ hospital in Mumbai after chest pain : भारतात मोस्ट वाँटेड असलेला फरार आरोपी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याच्याविषयीची एक मोठी बातमी. इकबाल कासकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे इकबाल कासकर याला मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

Mumbai News: मुंबईमध्ये 26/11 सारखा हल्ला करणार; धमकी देणारा संशयित विरारमधून ताब्यात

Thane: ठाणेकरांनो, काळजी घ्या..! तीन दिवसांत जिल्ह्यात Swine Flu चा उद्रेक; रूग्णांमध्ये वाढ

नवी मुंबई येथील तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या इकबालने शनिवारी रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर जेल प्रशासनाने इकबाल कासकर याला मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या हॉस्पिटलमध्ये इकबाल कासकरवर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. 

Tamhini Ghat: वाशिममधल्या तरूणांचा भीषण अपघात, ताम्हिणी घाटात 200 फूट दरीत कोसळली; तीन ठार

इकबाल कासकर याला ईडीने आर्थिक अफरातफर प्रकरणात अटक केली आहे. याआधी ठाणे पोलिसांच्या एका टीमने प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वात इकबाल कासकर याला सप्टेंबर २०१७ मध्ये अटक केली होती. इकबालवर एका विकासकाकडे खंडणीची मागणी केल्याचा आरोप होता. नंतर झालेल्या तपासात इकबाल कासकर याच्यावर तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये खंडणीची मागणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. तळोजा जेलमध्ये असलेल्या इकबाल कासकर याला ईडीने आर्थिक अफरातफर प्रकरणात जून २०२१ मध्ये ताब्यात घेतले. सध्या आर्थिक अफरातफर प्रकरणात इकबाल कासकर न्यायालयीन कोठडीत तळोजा जेलमध्ये आहे. 

तळोजा जेलमध्ये असताना शनिवारी रात्री इकबाल कासकर याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर त्याला मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये पोलीस बंदोबस्तात इकबाल कासकर याच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी