गर्लफ्रेंडच्या घरी रामपुरी चाकू घेऊन पोहोचला दाऊद, प्रेयसीने समजावले तेव्हा झाले असे...

Dawood Ibrahim : दाऊद त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी एकदा रामपुरी चाकू घेऊन गेला होता असा एक किस्सा सांगितला जातो.

Dawood Ibrahim
गर्लफ्रेंडच्या घरी रामपुरी चाकू घेऊन पोहोचला दाऊद, प्रेमिकेने दिली सक्त समज तेव्हा झाले असे... 

थोडं पण कामाचं

  • दाऊदच्या दुकानाच्या बाजूला होते सुजाताचे घर
  • सुजाताच्या वडिलांनी दाऊदला दिले हे उत्तर
  • फसवले गेल्याच्या भावनेत बाहेर पडला दाऊद

Dawood Ibrahim : भारताचा (India) एक क्रमांकाचा शत्रू (enemy) असलेला दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) सध्या कुठे लपून बसलेला आहे याबद्दल कोणालाच माहिती नाही. मुंबईच्या बाँबस्फोटांचा (Mumbai bomb blasts) सूत्रधार असलेला दाऊद अनेक राज्यांच्या पोलिसांच्या (police) वाँटेड लिस्टवर (wanted list) आहे. एकेकाळी तो मुंबईवर (Mumbai) राज्य करत असे आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये (serious crimes) त्याचा सहभाग असे. अंडरवर्ल्डशी (underworld) संबंधित सर्वात मोठे नाव असलेल्या दाऊदबद्दल अनेक किस्से (anecdotes) आहेत. यापैकीच एक किस्सा म्हणजे दाऊद त्याच्या गर्लफ्रेंडला (girlfriend) मिळवण्यासाठी रामपुरी चाकू (Rampuri knife) घेऊन तिच्या घरी (house) पोहोचला होता.

दाऊदच्या दुकानाच्या बाजूला होते सुजाताचे घर

असे म्हटले जाते की दाऊद इब्राहिम मुंबईत गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित होता, पण इतका कुख्यात झाला नव्हता. हुसैन जैदी यांनी आपल्या ‘डोंगरी ते दुबई’ या आपल्या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. या पुस्तकानुसार मुंबईच्या मुसाफिर खान्यात दाऊदच्या दुकानाच्या बाजूलाच सुजाता नामक एक पंजाबी मुलगी राहात असे. ती दाऊदला आवडत असे. त्या दोघांचे अफेअर झाले. जेव्हा सुजाताच्या आईवडिलांना याबद्दल समजले तेव्हा त्यांच्या घरी मोठाच गोंधळ झाला.

सुजाताच्या वडिलांनी दाऊदला दिले हे उत्तर

दाऊद हा मुस्लिम होता आणि त्यावेळीही त्याच्यावर गुंड असा शिक्का लागलेला होता. सुजाताच्या वडिलांनी गडबडीने तिचा साखरपुडा आपल्या समाजातील एका मुलाशी केला. जेव्हा दाऊदला याबद्दल कळले तेव्हा तो रागाने रामपुरी चाकू घेऊन सुजाताच्या घरीच पोहोचला. सुजाताच्या वडिलांनी त्यावेळी त्याला सांगितले की त्यांच्या मुलीला तिच्या मर्जीने निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पण तिने दाऊदशी विवाह केला तर ती अनाथ होईल.

फसवले गेल्याच्या भावनेत बाहेर पडला दाऊद

या पुस्तकात लिहिलेल्या माहितीनुसार सुजाता शेवटी तिच्या आईवडिलांच्या निर्णयासमोर झुकली. तिने दाऊदकडे कडक दृष्टीने पाहिले आणि त्याला सांगितले की त्यांचे एकत्र आयुष्य शक्य नाही. सुजाताचे म्हणणे ऐकून दाऊदला धक्काच बसला. त्याला स्वतःची फसवणूक झाल्यासारखे वाटले आणि सुजाताला शिव्या देत तो तिच्या घरातून बाहेर पडला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी