कोरोनामुळे महाराष्ट्रात महिलांपेक्षा जास्त पुरुषांचा मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 19, 2022 | 21:44 IST

death of male more thane female in maharashtra : कोरोनामुळे महाराष्ट्रात महिलांपेक्षा जास्त पुरुषांचा मृत्यू झाला. हा अहवाल महाराष्ट्राच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीने दिला आहे. 

death of male more thane female in maharashtra
कोरोनामुळे महाराष्ट्रात महिलांपेक्षा जास्त पुरुषांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोरोनामुळे महाराष्ट्रात महिलांपेक्षा जास्त पुरुषांचा मृत्यू
  • राज्यात १ लाख ४५ हजार ९९९ कोरोना मृत्यू झाले असतानाच्या आकड्यांच्या आधारे विश्लेषण
  • अहवालानुसार कोरोनामुळे राज्यात ९६ हजार ७५९ पुरुष आणि ४९ हजार २४० महिलांचा मृत्यू झाला

death of male more thane female in maharashtra : कोरोनामुळे महाराष्ट्रात महिलांपेक्षा जास्त पुरुषांचा मृत्यू झाला. हा अहवाल महाराष्ट्राच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीने दिला आहे. 

महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याच्या १९ जून २०२२ च्या अहवालानुसार राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ८८६ मृत्यू झाले आहेत. पण विश्लेषण समितीने राज्यात १ लाख ४५ हजार ९९९ कोरोना मृत्यू झाले असतानाच्या आकड्यांच्या आधारे विश्लेषण करून अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार कोरोनामुळे राज्यात ९६ हजार ७५९ पुरुष आणि ४९ हजार २४० महिलांचा मृत्यू झाला आहे. समितीने अहवालात कोरोनामुळे महिलांपेक्षा जास्त पुरुषांचा मृत्यू होण्याची कारणे दिली आहेत.

  1. कोरोना काळात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे जास्त काळ घराबाहेर असणे
  2. पुरुषांमध्ये महिलांपेक्षा सहव्याधीचे(co-morbidities) प्रमाण जास्त असणे
  3. व्यसनाधीनतेचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असणे
  4. महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असणे

महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूची प्रशासन नोंद करते. या नोंदींची माहिती घेऊन डॉक्टरांनी हा विश्लेषण करणारा अहवाल तयार केला आहे. या अहवालाच्या आधारे राज्यात पुढील जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

महाराष्ट्रात २३७४६ कोरोना Active, आज ४००४ रुग्ण, १ मृत्यू

महाराष्ट्रात आज ४००४ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर ३०८५ जण बरे झाले. राज्यात २३७४६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७९ लाख ३५ हजार ७४९ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ६४ हजार ११७ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ८८६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी १६ लाख ०३ हजार ५०६ कोरोना चाचण्यांपैकी ७९ लाख ३५ हजार ७४९ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८६ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७२ टक्के, रिकव्हरी रेट ९७.८४ टक्के आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी