Hanuman Chalisa : पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केले हनुमान चालीसा पठण, राज्य सरकारला विचारला हा प्रश्न 

राज्यात हनुमान चालीसावरून राजकारण तापत चालले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पत्रकार परिषदेत आज फडणवीस यांनी हनुमान चालीसाचे पठण केले तसेच हनुमाच चालीसा महाराष्ट्रात नाही म्हणायची तर काय पाकिस्तानात म्हणायची का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

devendra fadanvis
देवेंद्र फडणवीस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात हनुमान चालीसावरून राजकारण तापत चालले आहे.
  • विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले
  • पत्रकार परिषदेत आज फडणवीस यांनी हनुमान चालीसाचे पठण केले.

Hanuman Chalisa : मुंबई : राज्यात हनुमान चालीसावरून राजकारण तापत चालले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पत्रकार परिषदेत आज फडणवीस यांनी हनुमान चालीसाचे पठण केले तसेच हनुमाच चालीसा महाराष्ट्रात नाही म्हणायची तर काय पाकिस्तानात म्हणायची का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

फडणवीस म्हणाले की राज्यात अराजकता माजली आहे आणि ठाकरे सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक केल्याबद्दल फडणवीस यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. राणा दाम्पत्यांना केलेली अटक बेकायदेशीर आहे, नवनीत राणा यांना त्रास देण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले. 


आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजने केले होते. त्यावर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणावीस म्हणाले की गेल्या काही दिवसांत ठाकरे सरकारने सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधी पक्षाला लक्ष्य केले आहे. त्यामुळेच आपण सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातल्याचे फडणवीस म्हणाले. किरीट सोमय्यांवर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसेच ज्यांना ज्यांना हनुमान चालीसा पठण करायचे आहे त्यांनी माझ्या घराजवळ यावे आणि आपण मिळून हनुमाचा चालीसा म्हणून असेही फडणवीस म्हणाले. 


नवनीत राणा यांच्यासोबत गैरवर्तन

फडणवीस म्हणाले की खासदार नवनीत राणा यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले आहे. त्यांना शौचालयाला जाऊ दिले नाही, त्यांना पाणीसुध्दा दिले नाही. हे सुडाचे राजकारण असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच सत्तेत अहंकारी लोक बसले असून लोकशाहीला नख लावून आपले राज्य चालवत आहेत. परंतु आम्ही घाबरणार नाही आम्ही संघर्ष करणार आणि महाविका आघाडी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणाअर असेही फडणवीस म्हणाले. पोलिसांना सोबत घेऊन जर आमच्यावर हल्ले केले तर लक्षात ठेवा की पश्चिम बंगालमध्ये आमचे शेकडो कार्यकर्ते मारले गेले आहेत, आम्ही गप्प बसणार नाही असे फडणवीस म्हणाले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी