Deepak Sawant car accident: माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात, दीपक सावंत जखमी

मुंबई
सुनिल देसले
Updated Jan 20, 2023 | 14:28 IST

Deepak Sawant Car Accident: राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Deepak Sawant car accident
Deepak Sawant car accident: माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात, दीपक सावंत जखमी 
थोडं पण कामाचं
  • माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात
  • अपघातात दीपक सावंत जखमी

Deepak Sawant health updates: राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दीपक सावंत यांच्या कारला डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात दीपक सावंत यांना दुखापत झाली आहे. (Deepak Sawant car accident check health live updates read in marathi)

दीपक सावंत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील अंधेरी परिसरातील रुग्णालयात दीपक सावंत यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पालघर येथील आश्रम शाळेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी दीपक सावंत हे पालघरकडे निघाले होते. पालघरला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. एका भरधाव डंपरने दीपक सावंत यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.

हे पण वाचा : गोरे होण्यासाठी काय खावे? सौंदर्य वाढविण्यासाठी कामी येतील ही फळे

डॉक्टर दीपक सावंत हे सकाळच्या सुमारास पालघरकडे रवाना झाले. दीपक सावंत यांची कार काशिमिरा परिसरात पोहोचली तेव्हा त्यांच्या कारला डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच दीपक सावंत यांच्या पाठीला आणि मानेलाही दुखापत झाली आहे.

हे पण वाचा : जोडीदाराला करायचंय इम्प्रेस? मग राशीनुसार निवडा लिपस्टिक कलर

महाराष्ट्रातील नेत्यांच्या गाडीचे अपघात सत्र (Maharashtra Political leaders accident)

6 जानेवारी 2023 - योगेश कदम यांच्या गाडीला अपघात (Yogesh Kadam car accident)

मुंबई - गोवा महामार्गावर रात्रीच्या सुमारास योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला होता. योगेश कदम हे दापोलीहून मुंबईकडे येत असताना कशेडी घाटात हा अपघात झाला होता.

11 जानेवारी 2023 - बच्चू कडू यांचा अपघात (Bacchu Kadu car accident)

प्रहारचे नेते बच्चू कडू यांचाही काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. अमरावती येथे सकाळच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना त्यांना एका बाईकस्वाराने धडक दिली. या अपघातात बच्चू कडू यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली होती.

हे पण वाचा : दही वापरा अन् लांबसडक घनदाट केस मिळवा

4 जानेवारी 2023 - धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला मार (Dhananjay Munde car accident)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. बीड जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला होता.

हे पण वाचा : कांदा चिरण्यासाठी वापरा आयडिया ढासू, येणार नाही डोळ्यात आसू

24 डिसेंबर 2022 - आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात (Jaykumar Gore car accident)

साताऱ्यातील मान खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरेयांच्या कारला अपघात झाला होता. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं त्यांची गाडी 30 फूट खोल दरीत कोसळली होती. या अपघातात जयकुमार गोरे यांच्यासह गाडीतील चौघांना दुखापत झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी