मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार मनसे अध्यक्ष (MNS president) राज ठाकरेंना (Raj Thackeray) उत्तर देण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करत आहे. आता गृहमंत्री (Home Minister) राज यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई करता येईल याची शहानिशा तपासून पाहत आहे. देशात जाणीवपूर्वक धृवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील जनतेनं शांतता राखावी. आम्ही परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत, राज्यातल्या जनतेनं निर्धास्त राहावं, कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन कोणीही करू नये, ती अबाधित राखण्यासाठी पोलीस सक्षम आहेत, ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. असे सांगत राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी जनतेला आवाहन केले आहे.
गृहखातं अॅक्शन मोडमध्ये
राज ठाकरेंची सभा झाल्यानंतर गृहखातं अॅक्शन मोडमध्ये आले आहे. राज ठाकरेंवर कारवाई करण्यासाठी पंदी शोधू लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औरंगाबादमधील भाषण प्रक्षोभक असून त्यांच्या या भूमिकेचे सर्वधर्मियांवर परिणाम होतील. राज ठाकरे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल गृहमंत्र्यांनी केला आहे. ते म्हणाले, राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर संवेदनशील भागांसाठी विशेष सूचना गृह मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे, तसेच त्यांच्या भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून कारवाई करणार असल्याचे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह विभाग अॅक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. औरंगाबादचे पोलीस राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा पोलीस घेणार आहेत. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पोलीस पुढची कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.