School Fee : पालकांच्या खिश्यावरील भार झाला कमी; फीमध्ये 15 टक्के सवलत देण्याचे शाळांना आदेश

मुंबई
भरत जाधव
Updated May 02, 2022 | 16:28 IST

राज्यातील विद्यार्थ्यांसह (Students) पालकांसाठी (Parents) मोठी दिलासादायक बातमी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कांत (Tuition fees) 15 टक्के सवलत देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने (Maharashtra State Education Department) शाळांना (schools) दिले आहेत.

15 per cent discount on school fees - Education Department orders
शाळेच्या फीमध्ये मिळणार 15 टक्के सवलत  |  फोटो सौजन्य: Indiatimes

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांसह (Students) पालकांसाठी (Parents) मोठी दिलासादायक बातमी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कांत (Tuition fees) 15 टक्के सवलत देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने (Maharashtra State Education Department) शाळांना (schools) दिले आहेत. राज्यात कोरोना काळात म्हणजेच वर्ष 2021 मध्ये शिक्षण विभागाने जाहीर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 15 टक्के सवलती देण्याचा निर्णय घेतला होता.

आता त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शिक्षण विभागाने निर्णय दिल्यानंतर देखील राज्यातील अनेक शाळांना त्याची अंमलबजावणी केलेली नव्हती. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे आता शिक्षण विभागाने पुन्हा परिपत्रक काढले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आकारण्यात आलेली 15 टक्के फी परत करा, नाही तर ती पुढील वर्षाच्या फीमध्ये समाविष्ट करा, असे आदेश राज्य शिक्षण विभागाने म्हटले आहे.
शिक्षण विभागाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे, की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 15 टक्के कपात करण्यात आली होती.

परंतु काही शाळांनी अद्याप निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान या संदर्भात बहुतांश पालकांच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या.  मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हातील तसेच मुंबईच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना हा शिक्षण विभागाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी