Ajit Pawar : पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करता येणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले स्पष्टीकरण

जेव्हा पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या तेव्हा केंद्र सरकारने कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा होता, परंतु राज्य सरकारने दारूवरील कर कमी केला पेट्रोल डिझेलवरील नाही अशी टीका विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. पेट्रोल डिझेलवरील कर कमी केल्यास राज्याच्या तिजोरीला फटका बसेल असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले आहे. ajit pawar clarification on petrol diesel price

थोडं पण कामाचं
  • पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या तेव्हा केंद्र सरकारने कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा होता
  • राज्य सरकारने दारूवरील कर कमी केला
  • पेट्रोल डिझेलवरील कर कमी केल्यास राज्याच्या तिजोरीला फटका बसेल असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.

Ajit Pawar : मुंबई :  जेव्हा पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या तेव्हा केंद्र सरकारने कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा होता, परंतु राज्य सरकारने दारूवरील कर कमी केला, पेट्रोल डिझेलवरील नाही अशी टीका विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी विधानसभेत (Assemblly) केली होती. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे. पेट्रोल डिझेलवरील कर कमी केल्यास राज्याच्या तिजोरीला फटका बसेल असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले आहे. (deputy cm ajit pawar clarification on petrol diesel price in maharashtra assembly )

महसूलावर परिणाम

विधीमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की जर पेट्रोल डिझेलवरील कम केला तर राज्याला २५० कोटी रुपयांचा महसूल कमी होईल, त्यामुळे सरकारी तिजोरीला फटका बसेल. जेव्हा केंद्र सरकारने कर कमी केला तेव्हा भाजप शासित राज्यांनीही पेट्रोल डिझेलवरील कर कमी केला. यामुळे त्या त्या राज्यांना आर्थिक फटका बसला आहे असेही पवार म्हणाले. 

दोन राज्यांनी दिलासा दिला नाही

असे असले तरी पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या दोन राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील कुठलेही दर कमी केले नाही याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे राज्यात पेट्रोल डिझेलवरील दर कमी करता येणार नाही असे पवार यांनी स्पष्ट केले.  

राज्याला आर्थिक फटका

ज्या राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील दर कमी केले आहेत त्यांच्या महसुलात २५० कोटी रुपयांची घट झाली आहे, महाराष्ट्रात जर असे केल्यास आर्थिक फटका बसेल सध्या राज्याचा महसूल घटेल असा कुठलाच निर्णय घेता येणार नाही असे पवार म्हणाले. 


म्हणून दारूवरील कर कमी केला

इम्पोर्टेड दारूवरील कर ३०० टक्क्यांनी १५० टक्क्यांवर आणल्याचे स्पष्टीकरणीही अजित पवार यांनी दिले. पूर्वी दिल्लीहून एक व्यक्ती ७५० मिलिलीटर दारूची बॉटल आणायचा. ही बॉटल दिल्लीत त्याला ३ हजार रुपयांना मिळायची, तिच बॉटल महाराष्ट्रात ५ हजार रुपयांना मिळायची. त्यामुळे महाराष्ट्राचा महसूल बुडायचा असे अजित पवार म्हणाले. आता आयात केलेल्या दारूवर कर कमी केल्याने असे प्रकार होणार नाही, दारू तस्करी होणार नाही तसेच बनावट दारूही विकली जाणार नाही. पूर्वी राज्याला दारू विक्रीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा महसूल मिळायचा. आता वर्षाला २०० कोटी रुपयांचा महसूल मिळेल असा अंदाजही पवार यांनी यावेळी व्यक्त केला

विरोधी पक्षात आम्ही असतो तर आम्हीही हेच म्हणालो असतो


विरोधी पक्षातील नेते सुधीर मुनंगटीवार यांनी राज्यात दारूचे दर कमी केले पण पेट्रोल डिझेलचे दर नाही अशी टीका केली. विरोधी पक्षाने अशी टीका करणे सहाजिक आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसेच जर मुनंगटीवर पक्षात असते आणि आम्ही विरोधी पक्षात असतो आणि राज्य सरकारने असा निर्णय घेतला असता तर आम्हीही अशाच प्रकारे टीका केली असती असेही पवार यावेळी म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी