उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, चाचणी पॉझिटिव्ह, ब्रीच कँडी रुग्णालयात झाले दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याने ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून थकवा जाणवत असल्याने ते त्यांच्या निवासस्थानीच विलगीकरणात होते.

Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, चाचणी पॉझिटिव्ह, ब्रीच कँडी रुग्णालयात झाले दाखल  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • अजित पवार यांनी ट्विटरवरून दिली माहिती
  • अजित पवार हे विश्रांतीसाठी रुग्णालयात- राजेश टोपे
  • परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची केली पाहणी

मुंबई: महाराष्ट्राचे (Maharashtra) उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि अर्थमंत्री (Finance Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (tests positive for corona) आली आहे. एबीपी माझाच्या बातमीनुसार त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले (admitted in Breach Candy hospital) गेले आहे. अजित पवार यांनी स्वतः ट्विटरवरून (Twitter) ही माहिती दिली आहे. अजित पवार यांना थकवा जाणवत (suffering from weakness) असल्याने गेल्या चार दिवसांपासून ते त्यांच्या घरीच विलगीकरणात (home quarantined) होते. आज सकाळी ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

अजित पवार यांनी ट्विटरवरून दिली माहिती

अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करून आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.’

याआधीच्या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काळजी न करण्याचे आवाहन केले असून ते लवकरच पुन्हा परतणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन.’

अजित पवार हे विश्रांतीसाठी रुग्णालयात- राजेश टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की पवार यांना खोकला झाला असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती सामान्य असून त्यांना केवळ विश्रांतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचीही कोरोना चाचणी झाली असून ते सर्वजण निगेटिव्ह आहेत.

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची केली पाहणी

परतीच्या पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे गेल्या आठवड्यात पुणे आणि इंदापूरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या भागातील नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या दौऱ्यात त्यांना थकवा जाणवत होता आणि परतल्यानंतर तापही आला होता. ते घरीच राहून आराम करत होते, पण कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी