Deshmukh is being treated at a government hospital while Malik is being treated at a private hospital : मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख खंडणी वसुली आणि आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात तर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आर्थिक अफरातफर आणि दहशतवाद्याशी आर्थिक व्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोघांच्या संदर्भात मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टाने महत्त्वाचे निर्णय दिले.
खांद्याच्या दुखवण्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेण्यासाठी अनिल देशमुख यांना परवानगी नाकारण्यात आली. यामुळे अनिल देशमुख यांना निखळलेल्या खांद्यावर उपचार करण्याकरिता मुंबईच्या जे. जे हॉस्पिटलमध्येच दाखल व्हावे लागणार आहे. दुसरीकडे नवाब मलिक यांना मधुमेह आणि तब्येतीच्या इतर कारणांसाठी मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. नवाब मलिक कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार घेणार आहेत.
नवाब मलिक खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहेत. यामुळे नवाब मलिक यांचा हॉस्पिटलमधील उपचारांचा खर्च तसेच त्यांच्या निमित्ताने हॉस्पिटलमध्ये पोलीस संरक्षणावर होणारा खर्च मलिक कुटुंबालाच करावा लागणार आहे . मलिक यांच्यासोबत त्यांच्या एका नातलगाला हॉस्पिटलच्या खोलीत थांबण्याची परवानगी असेल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.