मुख्यमंत्र्यांवर टीका केली तरीही भास्कर जाधवांना आवडली राज ठाकरेंची सभा, जाणून घ्या काय आहे निरीक्षण

मुंबई
भरत जाधव
Updated May 23, 2022 | 17:27 IST

अयोध्या दौरा (Ayodhya tour) रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष (MNS president) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात घेतलेल्या सभेत वेगळाच आरोप केला. दरम्यान या सभेत त्यांनी सुरुवातीलाच शरद पवारावर नाव न घेता टीका केली तर हिंदुत्त्वाचा आणि औरंगाबाद  नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना (Shiv Sena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Chief Minister Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला.

 Bhaskar Jadhav appreciates Raj Thackeray's speech
राज ठाकरेंच्या भाषणाचं भास्कर जाधवांकडून कौतुक  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भाजपाचं खरं रुप काय, त्यांनी काढलेली नखं राज ठाकरेंनी वेळीच ओळखली.
  • राज यांच्या भाषणावरुन त्यांना हिणवण्याऐवजी त्याकडे राजकीय प्रगल्भतेनं पाहिलं पाहिजे
  • राज ठाकरेंचं भाषण गांभीर्याने घेण्याची गरज - भास्कर जाधव

मुंबई :  अयोध्या दौरा (Ayodhya tour) रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष (MNS president) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात घेतलेल्या सभेत वेगळाच आरोप केला. दरम्यान या सभेत त्यांनी सुरुवातीलाच शरद पवारावर नाव न घेता टीका केली तर हिंदुत्त्वाचा आणि औरंगाबाद  नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना (Shiv Sena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Chief Minister Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. शिवाय अयोध्या दौरा विरोध हा एक जाळं असल्याचा आरोप देखील राज यांनी आपल्या सभेतून केला. राज ठाकरेंची सभा सरकारच्याविरोधात असली तर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंची कौतुक केलं आहे. 

अयोध्या दौरा काही जणांना खुपला. त्यासाठी विरोधाचा सापळा रचून त्याला राज्यातूनच रसद पुरविण्यात आली. त्यामुळे अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्यामागील भूमिका रविवारी स्पष्ट केली. राज ठाकरेंच्या या सभेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या. परंतु शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंच्या या सभेचं तोंड भरुन कौतुक केलं. 
प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी राज यांच्या भाषणावरुन त्यांना हिणवण्याऐवजी त्याकडे राजकीय प्रगल्भतेनं पाहिलं पाहिजे असा सल्ला महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि समर्थकांना दिला. राज यांच्या भाषणाने शिवसेनेचे आमदार असणारे जाधव चांगलेच प्रभावित झाले आहेत. “राज ठाकरेंच्या भाषणात अनेक अर्थ दडलेले आहेत. कालचं राज ठाकरेंचं भाषण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” असं भास्कर जाधव म्हणालेत. 

“किंबहुना राज ठाकरेंनी काल जे भाषण केलं ते राजकीय दृष्ट्या प्रगल्भतेनं तसेच अतिशय वैचारिक पद्धतीने घेण्याची गरज आहे. परिपक्व राजकारणी म्हणून त्या भाषणाकडे बघण्याची आवश्यकता आहे. भाजपाच्या बृजभूषण सिंह या एका खासदाराला तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गप्प करु शकत नव्हते का? हे ते बोलले. महाराष्ट्रातून हे कोणीही आपल्या अंगावर घेण्याची गरज नाही,” असंही भास्कर जाधव म्हणाले आहेत. “यावरुन भाजपाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याचं दिसून येतं. भाजपाचं खरं रुप काय, त्यांनी काढलेली नखं राज ठाकरेंनी वेळीच ओळखली. म्हणून मी हे भाषण राजकीय प्रगल्भतेनं घेण्याची गरज आहे. गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असल्याचे ते म्हणाले,”  “विशेष करुन महाविकास आघाडीच्या सर्वच लोकांना मी विनंती वजा आवाहन करेल की कालचं राज ठाकरेंचं भाषण किंवा त्यांचा रद्द झालेला अयोध्या दौऱ्याच्या मुद्द्याला कुणीही हवा देण्याचं काम करू नये, कुणीही चेष्टेचा विषय करू नये,” असंही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी