Devendra Fadanvis : राज ठाकरे पैसे घेऊन सुपारी वाजवतात, देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ व्हायरल

मशीदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. या भूमिकेचे अनेक भाजप नेत्यांनी स्वागत केले होते. तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापनेवरून राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे बरोबर बोलत आहेत असे म्हणाले होते. परंतु राज ठाकरे पैसे घेऊन सुपारी वाजवतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीवेळी केली होती. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

devendra fadanvis
देवेंद्र फडणवीस   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मशीदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता.
  • या भूमिकेचे अनेक भाजप नेत्यांनी स्वागत केले होते.
  • राज ठाकरे पैसे घेऊन सुपारी वाजवतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीवेळी केली होती. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Devendra Fadanvis : मुंबई : मशीदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. या भूमिकेचे अनेक भाजप नेत्यांनी स्वागत केले होते. तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापनेवरून राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे बरोबर बोलत आहेत असे म्हणाले होते. परंतु राज ठाकरे पैसे घेऊन सुपारी वाजवतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीवेळी केली होती. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (devendra fadanavis criticized raj thackeray old video gone viral on social media)

 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र ने Rajthakre. को कहा रिटायर्ड और राज ठाकरे पैसे लेकर सुपारी बजाता है‼️

Posted by Syed Yusuf Iqbal on Monday, April 4, 2022


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपला एकही उमेदवार उभा केला नव्हता. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव व्हावा म्हणून त्यांनी भाजपविरोधात प्रचारसभाही घेतल्या होत्या. याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या पक्षाला झाला तरी चालेल असे राज ठाकरे म्हणाले होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साम मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. तेव्हा फडणवीस म्हणाले होते की, एखादा खेळाडून क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो फक्त कॉमेंट्री करतो. तो निवृत्त खेळाडून मानधन घेऊन कॉमेंट्री करतो, राज ठाकरेंच माहित नाही. तशीच अवस्था राज ठाकरे यांची आहे. राज ठाकरे सध्या केवळ कॉमेंट्री करत आहेत. राज ठाकरे सध्या खेळत नसून ते निवृत्त आहेत. परंतु पैसे घेऊन ज्याची सुपारी घेतली आहे ती वाजवावीच लागणार आहे म्हणून राज ठाकरे ती सुपारी वाजवत आहेत अशी टीका फडणवीस यांनी केली होती. 

 

राज ठाकरे साहेब यांची औकात देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात...

Posted by Arun Redkar on Monday, April 4, 2022

गुढी पाडव्याच्या मेळाव्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. भाजप नेते नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटही होती. परंतु ही भेट वैयक्तिक आहे आणि यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नव्हती असे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिले होते. असे असले तरी देवेंद्र फडणवीस यांचा हा जुना व्हिडीओ वायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी