Devendra Fadanavis : जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला नव्हता, तेव्हा पालिकेत आमचा नगरसेवक होता, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

शिवसेनेची भाजपसोबत २५ वर्षे युतीत सडली या भूमिकेवर मी आजही ठाम आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती, यावर देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे हेच युतीचे नेते होते, त्यांचा निर्णय चुकीचा होता का असा सवाल करत शिवसेनेवेर टीका केली आहे. तसेच शिवसेना सत्तेसाठी लाचार असून झाली आहे. जेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता तेव्हा आमचा पालिकेत नगरसेवक होता, मुंबईत आमदार होते असेही फडणवीस म्हणाले.

devendra fadanvis
देवेंद्र फडणवीस   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बाळासाहेब ठाकरे हेच युतीचे नेते होते, त्यांचा निर्णय चुकीचा होता का ?
  • शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली
  • जेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून भाजप हिंदुत्ववादी आहे.

Devendra Fadnavis : मुंबई : शिवसेनेची भाजपसोबत २५ वर्षे युतीत सडली या भूमिकेवर मी आजही ठाम आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती, यावर देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे हेच युतीचे नेते होते, त्यांचा निर्णय चुकीचा होता का असा सवाल करत शिवसेनेवेर टीका केली आहे. तसेच शिवसेना सत्तेसाठी लाचार असून झाली आहे. जेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता तेव्हा आमचा पालिकेत नगरसेवक होता, मुंबईत आमदार होते असेही फडणवीस म्हणाले. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (devendra fadanavis criticized shivsena over Hinduism and government )

फडणवीस म्हणाले की, जेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून भाजप हिंदुत्ववादी आहे. जेव्हा शिवसेनेची स्थापनाही झाली नव्हती तेव्हा आमचा पालिकेत नगरसेवक होता, मुंबईत आमदार होते. राम मंदिराच्या आंदोलनासाठी आम्ही लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेत, तेव्हा शिवसेना कुठे होती असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. तसेच मोदींमुळेच आज उत्तर प्रदेशमध्ये भव्य राम मंदिर उभे राहत आहे असेही फडणवीस म्हणाले. 

जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा शिवसेनेची लोकप्रियता वाढली होती. उत्तर प्रदेशमध्ये १९९३ साली शिवसेनेने १८० जागांवर उमेदवार उभे केले होते आणि १७९ जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते, त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेची ही परंपरा कायम राहिलेली आहे असेही फडणवीस म्हणाले. 

औरंगाबादाचे संभाजीनगर झालेले नाही

हिंदुत्वावरून फडणावीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली, फडणवीस म्हणाले की, शिवसेनेच्या तोंडून हिंदुत्व शोभत नाही, २० वर्षांपासून शिवसेनेला औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करता आली नाही, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करता आले नाही. परंतु भाजपने अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले आहे. जेव्हा तुम्ही हिंदुत्वाचे नाव घेता तेव्हा त्यात लाचारी दिसते असेही फडणवीस म्हणाले. 

मग बाळासाहेबांचा निर्णय चुकला का?

२५ वर्ष युतीत सडली या भूमिकेवर मी आजही ठाम आहे असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर फडणवीस म्हणाले की, २५ वर्षे बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती ठेवली. तेव्हा बाळासाहेबांचा हा निर्णय चुकीचा आहे असे आपले म्हणणे आहे का? त्यांच्या निर्णयावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत अहात, सत्तेसाठी ही कसली लाचारी ? असेही फडणवीस म्हणाले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी