Devendra Fadanvis : किडक्या लोकांनी स्क्रिप्ट देऊन महाराजांना चुकीची माहिती दिली – देवेंद्र फडणवीस

संभाजीराजे भोसले यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यावर संभाजीराजी भोसले यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली अशी माहिती शाहु महाराज यांनी दिली आहे. त्यावर किडक्या लोकांनी स्क्रिप्ट देऊन महाराजांचा चुकीची माहिती दिली अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच शाहु महाराज आमचे छत्रपती आहे त्यांच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

थोडं पण कामाचं
  • संभाजीराजे भोसले यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
  • किडक्या लोकांनी स्क्रिप्ट देऊन महाराजांचा चुकीची माहिती दिली अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
  • शाहु महाराज आमचे छत्रपती आहे त्यांच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

Devendra Fadanvis : मुंबई : संभाजीराजे भोसले यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यावर संभाजीराजी भोसले यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली अशी माहिती शाहु महाराज यांनी दिली आहे. त्यावर किडक्या लोकांनी स्क्रिप्ट देऊन महाराजांचा चुकीची माहिती दिली अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच शाहु महाराज आमचे छत्रपती आहे त्यांच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत, त्या गादीचा एक मोठा मान आहे त्यामुळे त्यांनी कुठलेही मत व्यक्त केला असला तरी त्या संदर्भात मी बोलणार नाही,  मला एवढेच वाटते की त्या संदर्भात त्यानंतरच स्वतः संभाजीराजे यांनी जी प्रतिक्रिया दिली ती बोलकी आहे असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, संभाजीराजांनी स्पष्टपणे ट्विट करून सांगितला आहे कि मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो की मी जे बोललो ते सत्य बोललो मला असं वाटतं की प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. मला एका गोष्टीचं दुख आहे काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसते त्या लोकांना समजत नाही ज्यांनी अशा प्रकारची माहिती दिली की एकीकडे अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजांना खोटे ठरत आहेत आणि दुसरीकडे महाराजांमध्ये आणि युवराज यांमध्ये अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात असं काम करतात त्यांचे वागण्याबद्दल मला प्रचंड दुःख आहे असेही फडणवीस म्हणाले.

संभाजी महाराजांचं नेतृत्व तयार होत होतं

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक गोष्ट निश्चितपणे याठिकाणी वाटते छत्रपती संभाजीराजे यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांमध्ये चांगल्याप्रकारे तयार होत होतं,  मराठा समाजात, बहुजन समाजात त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत अशा प्रकारचे नेतृत्व तयार झाल्यानंतर तेही पश्चिम महाराष्ट्रात असं नेतृत्व तयार झाल्यानंतर त्याचा कुठलाही नुकसान भारतीय जनता पक्षाला नाही त्याचं नुकसान हे कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे हे नेतृत्व तयार होऊ नये किंवा थांबावाव अशा प्रकारचा प्रयत्न कोण करणार हे साधं राजकारण ज्याला समजत त्याला देखील समजतं असेही फडणवीस म्हणाले.

तसेच एकच गोष्ट सांगतो की आभार मानण्या करता मला यावेळेस युवराज छत्रपती संभाजीराजे भेटले होते त्याच्या पूर्वी त्यांनी ही घोषणा केली होती की, मी कुठल्याही पक्षाचा तिकीट देणार नाहीये, मी स्वतंत्र उभा राहणार आहे. मला भेटेल त्या वेळेस त्याने मला हे सांगितलं माझी अपेक्षा आहे की आमच्या घराण्याची परंपरा बघता ज्या प्रकारे मागच्या वेळी राष्ट्रपती कोट्यातून भारतीय जनता पक्षाने आम्हाला समर्थन देऊन तिकीट दिलं होतं तसंच आता सगळ्या पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिले पाहिजे, मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की सगळेजण देणार असतील तर आम्ही पक्ष नेतृत्वाशी बोलून चर्चा करू परंतु काही माणसं ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते आता उघडे पडले आहेत असेही फडणवीस यांनी नमूद केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी