शिवतीर्थावर राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट, चर्चेला उधाण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 25, 2021 | 01:05 IST

Devendra Fadanvis meet Raj Thackeray at Shivteerth मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील नवे घर शिवतीर्थ येथे महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते.

Devendra Fadanvis meet Raj Thackeray at Shivteerth
शिवतीर्थावर राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट, चर्चेला उधाण 
थोडं पण कामाचं
  • शिवतीर्थावर राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट, चर्चेला उधाण
  • मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशी मैत्रीचे संबंध राखले
  • भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे

Devendra Fadanvis meet Raj Thackeray at Shivteerth मुंबईः मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील नवे घर शिवतीर्थ येथे महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते. राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. चर्चेची माहिती जाहीर झालेली नाही. पण राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीमुळे मनसे-भाजप युतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस या दांपत्याने राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे या दांपत्याची भेट घेतली. या भेटीत फडणवीस दांपत्याने ठाकरे दांपत्याचे नव्या घरासाठी अभिनंदन केले. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात स्वतंत्रपणे चर्चा झाल्याचे समजते. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांमध्ये काही मुद्यांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. थोडा वेळा शिवतीर्थ बंगल्याच्या बाल्कनीत उभे राहून फडणीवस आणि ठाकरे दांपत्य निवांत गप्पा मारत होते. नंतर चौघेही घरात जाऊन चर्चा करत होते. भाजपने फडणवीस दांपत्याने शिवतीर्थ बंगल्यावर जाणे ही कौटुंबिक बाब असल्याचे सांगितले. तर राजकीय विश्लेषक या भेटीमागे राजकारण असल्याची शक्यता व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ या कालावधीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशी मैत्रीचे संबंध राखले होते. मुंबई महानगरपालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत भाजपला ८२ आणि शिवसेनेला ८४ जागांवर विजय मिळाला, त्यावेळी फडणवीस यांनी भाजप मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार नसल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ तर मनसेला सात जागांवर विजय मिळाला. सत्ता स्थापन केल्यानंतर काही दिवसांनी शिवसेनेने मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला. शिवसेनेच्या या कृत्यामुळे राज ठाकरे नाराज झाले. पण २०१९च्या लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करुन आरोप केले. या नंतरही लोकसभेची निवडणूक जिंकून भाजपच्या नेतृत्वात पुन्हा सरकार स्थापन झाले. यानंतर २०२० मध्ये मनसेने पक्षाचा नवा झेंडा तयार केला. हा भगव्या रंगाचा झेंडा अस्तित्वात आल्यापासून भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे.

भाजपचा प्रयत्न मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांच्या निवडणुका जिंकून शिवसेनेची कोंडी करण्याचा आहे. यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. फडणवीस यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट ही भाजपच्या मनपा निवडणुकांच्या योजनेचा एक भाग असल्याची शक्यता आहे. याआधी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलार, प्रसाद लाड या नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. आता फडणवीस यांनीही राज यांची भेट घेतली आहे. यामुळेच भाजप-मनसे युतीची चर्चा जोर धरू लागली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी