devendra fadnavis challenge uddhav thackeray : मुंबई : तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला थेट इशारा दिला. भाजपने मुंबईत आयोजिलेल्या उत्तर सभा या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विचार करून भाजपने समाजाच्या वेगवेगळ्या थरांतील नागरिकांना उद्देशून संपर्क मोहीम आणि सभा सुरू केल्या आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून मुंबईत उत्तर भारतीयांना संबोधित करण्यासाठी उत्तर सभा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला.
आदल्या दिवशी (शनिवार १४ मे २०२२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे या सर्वांना लक्ष्य केले. या सभेला भाजपकडून आज (रविवार १५ मे २०२२) मुंबईत उत्तर सभा या कार्यक्रमातून उत्तर दिले गेले.
Raveena Tondon : अकबरुद्दीन ओवैसीचे अभिनेत्री रवीना टंडन कडून समर्थन, ट्विट करुन म्हणाली...
Uddhav Thackeray : भाजपचे हिंदुत्व खोटे, आम्हाला शिकवू नका... मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंची गर्जना
भाजपच्या उत्तर भारतीय विभागाने उत्तर सभा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उत्तर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना शब्दात पकडले. 'मुख्यमंत्र्यांना माझ्यावर केवढा विश्वास आहे. आज माझे वजन १०२ किलो आहे. जेव्हा मी बाबरी पाडण्यासाठी गेलो होतो त्यावेळी माझे वजन १२८ किलो होते. माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझे राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न आपण (उद्धव ठाकरे) करू शकता. पण लक्षात ठेवा, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही;' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'वाघाचे फोटो लावून वाघ होता येत नाही. राजकारणात वाघ होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. बाळासाहेब ठाकरे हे राजकारणातले वाघ होते. आज देशाच्या राजकारणात एकच वाघ आहे आणि हा वाघ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी;' असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. या मैद्याच्या पोत्याच्या पायावर नाक घासून मुख्यमंत्री झालात अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला.
शनिवारी सोनिया गांधींना खूष करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाषण केले. काँग्रेसचे नेते जसे आरोप करतात आणि ज्या पद्धतीने भाषण करतात अगदी तसेच उद्धव ठाकरे करताना दिसले. सरकार टिकविण्यासाठी त्यांनी सोनिया गांधींची मर्जी राखण्याला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.
उत्तर सभा सुरू होण्याआधी हनुमान चालीसा पठण झाले. या पठणाचा उल्लेख करून फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फक्त दोनच ओळी कळल्या असतील असे सांगितले.
राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसा रे।
हा उल्लेख 'हनुमान चालीसा'मध्ये आहे. उद्धव ठाकरेंना हा मुद्दा त्यांच्या पद्धतीने कळला असावा म्हणूनच यशवंत जाधवांची संपत्ती ३६ वरून ५३ ची झाल्याचे फडणवीस म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधी विचार केला नसेल की त्यांच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीसा पठण देशद्रोह असेल आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणे राजशिष्टाचार, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर माझ्या मंत्रिमंडळातील कुण्या अनिल देशुमख किंवा नवाब मलिकची हिंमत झाली नसती. आणि ज्या दिवशी दाऊदच्या सहकार्यासोबत बसायची वेळ आली असती, त्यादिवशी सत्तेला ठोकर मारून घरी बसलो असतो; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.