देवेंद्र फडणवीस यांची आता 'ही' आहे नवी ओळख!

मुंबई
पूजा विचारे
Updated Nov 13, 2019 | 11:18 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर आपली नवी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे फडणवीस आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचं दिसलं आहे. 

Devendra fadnvis
देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर नवी ओळख!  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • राजकीय तिढा न सुटल्यानं राज्यात मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू केली गेली.
  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर आपली नवी ओळख निर्माण केली आहे.
  • फडणवीस आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचं दिसलं आहे. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला लागला. त्यानंतर २० दिवसानंतर राज्यातल्या राजकीय तिढा न सुटल्यानं राज्यात मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू केली गेली. या निर्णयामुळे राज्यात विधीमंडळाचे कामकाज होणार नसून राज्यातल्या सर्व घडामोडींवर केंद्र सरकारचं नियंत्रण असेल. तसंच मंत्रीमंडळही बरखास्त झाले. त्यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर आपली नवी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे फडणवीस आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचं दिसलं आहे. 

आपल्या प्रचारसभेत वारंवार मी पुन्हा येईन असं सांगणारे फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री काढून महाराष्ट्र सेवक असं आपल्या बायोमध्ये लिहिलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्याची सर्व सूत्रं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात गेली. शुक्रवारीच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यपालांच्या विनंतीवरून आपणच काळजीवाहू मुख्यमंत्री कारभार पाहणार असल्याचं फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं. ५ वर्ष ८ दिवस मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 

Cm Twitter

फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील बायोमध्ये Chief Minister of Maharashtra म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही ओळख बदलली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर फडणवीस यांच्याकडची काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही संपली. त्यानंतर त्यांना काढा ट्विटर हँडलवरील नावापुढे लावलेलं काळजीवाहू मुख्यमंत्री पद काढून महाराष्ट्राचा सेवक  Maharashtra’s Sevak असं ट्विटरच्या बायोमध्ये लिहिलं आहे. 

भाजप अजूनही 'वेट अँड वॉच' च्या भूमिकेत

भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर भाजपनं सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता दर्शवली. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रण दिलं आणि शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली. मुदतीनुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. आमची सत्तास्थापनेची इच्छा आहे, पण संख्याबळ दाखवण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यपालांनी शिवसेनेची मागणी फेटाळून लावली आणि तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी-काँग्रेसला निमंत्रण दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीनं सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यान भाजप या सर्व घडामोडींवर  बारीक नजर ठेवून आहे. उद्यापासून तीन दिवस भाजप कार्यकारिणीच्या बैठका होणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी