देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला दिली मोठी ऑफर

मुंबई
Updated Dec 14, 2019 | 11:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Devendra Fadnavis on Shiv Sena: महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सत्तासंघर्षात दुरावा निर्माण झाला. मात्र, असे असताना आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

devendra fadnavis offer shiv sena ncp congress maharashtra vikas aghadi government formation uddhav thackeray cm politics news marathi
देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला दिली मोठी ऑफर (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेला ऑफर
  • शिवसेनेसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले
  • शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार?

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जुने मित्र पक्ष असलेले शिवेसना-भाजप यांच्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवरुन तिढा निर्माण झाला. यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत एकत्र येत राज्यात सत्तास्थापन केली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले आहेत. मात्र, त्याच दरम्यान आता राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

एका वृत्तवाहिनीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत भाष्य केलं आहे. शिवसेनेसाठी भाजपची दारे खुली असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"दारं आम्ही बंद केली नव्हती त्यांनी बंद केली. भाजपसोबत नेहमीच जवळा पक्ष शिवसेना होता. भाजप शिवसेनेसोबत निवडणूक लढला होता. मतं मागताना त्यांनी आमच्या नावावर मागितली आम्ही त्यांच्यासोबत मागितली. शिवसेनेने साथ देऊन पहावं आम्ही कधीच बंद केलं नव्हतं आम्ही तर ओ देतच होतो ते घ्यायला तयार नव्हते. त्यांना मांडु द्या आधी भूमिका, एकदा बोलूद्या. राज्यात महाराष्ट्राचा पॅटर्न पहायला मिळेल, वाट पहा" असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

शिवसेना आमच्या सोबत निवडणूक लढली होती निश्चितच शिवसेना आम्हाला जवळची होती आणि भविष्यातही राहील. या दोन पक्षांच्या तुलनेत तर शिवसेनाच जवळची राहील. पण आज ज्याप्रमाणे ते वागले आहेत ज्याप्रमाणे त्यांनी जनादेशाचा विश्वासघात केलाय त्यामुळे आज याबद्दल बोलणं योग्य होणार नाही. आली परिस्थिती तर योग्य निर्णय घेऊ असंही फडणवीस म्हणाले. 

हे सरकार जास्त काळ राहणार नाही 

"हे ऑटो रिक्षा सरकार आहे. ऑटो रिक्षा चांगली असते मात्र त्याच्या वेगाला मर्यादा असते. या ऑटो रिक्षाची तीन चाकं तीन वेगळ्या दिशेने जाणारे आहेत. अशाप्रकारचं सरकार फार काळ टिकेल असं मला वाटत नाही" असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी