फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, थोड्याच वेळात पत्रकार परिषद, मोठी घोषणा होण्याची शक्यता

मुंबई
Updated Nov 09, 2019 | 12:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Devendra Fadnavis: राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता दुपारी देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद होणार आहे.

devendra fadnavis press conference meet governor bhagat singh koshyari ayodhya verdict maharashtra government formation news marathi
देवेंद्र फडणवीस (फाईल फोटो) 

थोडं पण कामाचं

 • देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट
 • राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस घेणार पत्रकार परिषद
 • दुपारी २.३० च्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

मुंबई: राज्यातील सत्ता संघर्ष अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राज्यात नवं सरकार येईपर्यंत देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. त्यानंतर आता शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीची माहिती दिली. तसेच अयोध्या खटल्याच्या निकालाच्या दृष्टीने उचललेल्या पावलांची माहिती दिली असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सध्याच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली असली तरी दुपारी त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे आता ही पत्रकार परिषद नेमकी कोणत्या मुद्द्यावर आहे आणि फडणवीस हे काय भाष्य करणार यावरुन विविध चर्चा होत आहेत. राज्यात निर्माण झालेल्या राजकीय स्थितीत शिवसेना आणि भाजप यांच्यात आणखी तिढा वाढला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार की राज्यात आणखी काही राजकीय समीकरण घडतात हे पहावं लागेल.

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद या विषयावर शिवसेनेसोबत कुठलीही चर्चा झालीच नव्हती असं ठामपणे सांगितलं. त्यानंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप खोट बोलत असल्याचं सांगितलं. अमित शहा यांच्यासोबत काय बोलणं झालं हे सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 

निवडणुकीनंतर पक्षीय बलाबल

 1. भाजप - १०५ 
 2. शिवसेना - ५६ 
 3. राष्ट्रवादी - ५४ 
 4. काँग्रेस - ४४ 
 5. इतर - १३ 
 6. बहुजन विकास आघाडी - ३ 
 7. एमआयएम - २ 
 8. समाजवादी पक्ष - २ 
 9. प्रहार जनशक्ती पक्ष - २ 
 10. मनसे - १ 
 11. स्वाभिमानी पक्ष - १ 
 12. सीपीआय - १ 
 13. जन सुराज्य शक्ती - १ 
 14. क्रांतिकारी शेतकरी पक्ष - १
 15. शेकाप - १ 
 16. राष्ट्रीय समाज पक्ष - १ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी