देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हटले 'हा' कोणाचा जय किंवा पराजय नाही

मुंबई
Updated Nov 09, 2019 | 16:23 IST

Devendra Fadnavis: राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात.

devendra fadnavis press conference reaction ayodhya verdict maharashtra situation vidhan sabha election news marathi
'हा' कोणाचा जय किंवा पराजय नाही: देवेंद्र फडणवीस  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
  • भारतीय लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निर्णय - देवेंद्र फडणवीस
  • राज्यातील जनतेने निर्णय स्वीकारला त्याबद्दल जनेतेचे आभार - देवेंद्र फडणवीस

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी आपला ऐतिहासिक निकाल दिला आहे. वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यास न्यायालयाने परवानी दिली आहे. या निर्णयानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करत प्रतिक्रिया दिली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीसंदर्भात दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करतो. जनतेने शांतता राखून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वीकारला आहे.  सर्व पक्षकारांना पुरेसा वेळ देऊन हा निकाल दिला. या निकालामुळे न्यायप्रणालावरील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल. हा निकाल कोणाचाही विजय किंवा पराजय नाहीये अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देशातील जनभावनेचा आदर करणारा हा निर्णय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया सुरु होती. सत्य आणि न्यायालयाच्या मंथनातून अखेरचा हा निकाल आहे. सर्व धर्म, समुदायाने हा निकाल सहजभावाने स्वीकारावा आणि शातता राखावी असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्यास मान्यता दिली आहे. तर मशिदीसाठी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत इतर ठिकाणी पाच एकर जागा देण्यात यावी असं न्यायालयाने म्हटलं आहे. सरकारने येत्या तीन ते चार महिन्यांत एक ट्र्स्ट बनवून मंदिर बांधण्यासाठी अयोध्येतील ही जागा ट्रस्टकडे द्यावी असं न्यायालयाने सांगितलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...