राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मुंबई
सुनिल देसले
Updated Dec 15, 2019 | 08:24 IST

Devendra Fadnavis on Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केलंय.

devendra fadnavis rahul gandhi savarkar gandhi name politics news marathi
देवेंद्र फडणवीस (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई: काँग्रेस पक्षातर्फे दिल्लीत शनिवारी 'भारत बचाव रॅली'चं आयोजन केलं. होतं. या रॅलीत भाषण करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं, 'माझं नाव राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही. मी सत्याच्याच बाजूने आणि मरेपर्यंत माफी मागणार नाही' असं वक्तव्य केलं. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राहुल गांधी जे बोलले ते अक्षरश: लाजीरवाणं आहे. या देशात सावरकरांनी केवळ कारावास भोगला नाही तर अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. राहुल गांधी यांनी केलेला सावरकरांचा अपमान हा देश कधीच सहन करणार नाही. राहुल गांधी यांनी समजून घेतलं पाहिजे की केवळ गांधी आडनाव लावून कोणी गांधी होत नाही. महाराष्ट्र आणि देश कधीही राहुल गांधींना माफ करु शकणार नाही".

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर भाष्य करत म्हटलं, मला असं वाटतं की, सत्तेसाठी शिवसेना आज अशा लोकांसोबत आहे जे सावरकरांचाही अपमान करतात. आज आलेली शिवसेनेची प्रतिक्रिया किती मवाळ आहे. यापूर्वीच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या आहेत.

राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत भाजपवर टीका करताना म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची घोषणा दिली. पण देशात मेक इन इंडिया नाही तर रेप इन इंडिया दिसत आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन शुक्रवारी संसदेत भाजप महिला खासदारांनी आक्रमक होत राहुल गांधी यांनी महिलांची माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी दिल्लीतील 'भारत बचाव रॅली'मध्ये भाषण करत म्हटलं, 'माझं नाव राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही. मी सत्याच्याच बाजूने आणि मरेपर्यंत माफी मागणार नाही'. त्यानंतर आता यावरुन राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी