१५ ऑक्टोबरला मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

मुंबई
Updated Oct 10, 2019 | 20:08 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Devendra Fadnavis rally in Kankavali: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. अशाच प्रकारे १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांची कणकवलीत सभा होणार आहे.

devendra fadnavis rally kankavali narayan rane join bjp merge maharashtra swabhiman party vidhansabha election 2019
देवेंद्र फडणवीस (File Photo)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु
  • १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांची कोकणात जाहीर सभा
  • मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत होणार मोठी घोषणा

सिंधुदुर्ग: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्षाचे उमेदवार, नेते, कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राज्यभर प्रचारसभा घेत असून प्रचारसभांचा धडाका लावला आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकणात येणार असून कणकवलीत जाहीर प्रचारसभा घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांची १५ ऑक्टोबर रोजी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या जाहीर सभे दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. स्वत: नारायण राणे यांनीच या संदर्भात माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे हे भाजपत प्रवेश करणार असल्याचं वृत्त होतं मात्र, राणेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळत नव्हता. पण आता हा मुहूर्त ठरला असून त्याची तारीखच नारायण राणेंनी सांगितली आहे. इतकंच नाही तर राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा सुद्धा भाजपत विलीन करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पक्षात लोकसभा निवडणुकीपासूनच जोरदार इनकमिंग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे हे भाजपत प्रवेश करुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन करणार असल्याची जोरदार चर्चा होती. तसं ठरलंही होतं मात्र, शिवसेनेच्या भूमिकेमुळे राणेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळत नव्हता अशी माहिती समोर आली. त्यानंतर नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं आणि त्यांना भाजपने कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिली.

कणकवलीत शिवसेना-भाजप उमेदवारांत 'सामना'

कणकवली मतदारसंघातून भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिली असून त्याच मतदारसंघातून शिवसेनेने सतीश सावंत यांना एबी फॉर्म देत उमेदवारी दिली. सतीश सावंत यांनी कणकवली मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशीही सतीश सावंत यांनी माघार घेतली नाही त्यामुळे या निवडणुकीत नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत यांच्यात सामना होणार हे निश्चित आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...