Fadnavis Reaction On Sattar Statement : शिवसेना भाजपा एकत्र येण्याच्या सत्तारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रीया

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 05, 2022 | 20:10 IST

Devendra fadnavis reaction on abdul sattar statement that shiv sena and bjp can coming together : महाराष्ट्रात राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी शिवसेना भाजपा यांची युती होऊ शकते अशा स्वरुपाचे वक्तव्य केले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी 'मार्मिक' टिप्पणी केली. 

Devendra fadnavis reaction on abdul sattar statement that shiv sena and bjp can coming together
शिवसेना भाजपा एकत्र येण्याच्या सत्तारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रीया 
थोडं पण कामाचं
  • शिवसेना भाजपा एकत्र येण्याच्या सत्तारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रीया
  • फडणवीस यांची 'मार्मिक' टिप्पणी
  • अब्दुल सत्तार नया है वह - फडणवीस

Devendra fadnavis reaction on abdul sattar statement that shiv sena and bjp can coming together : मुंबई : महाराष्ट्रात राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी शिवसेना भाजपा यांची युती होऊ शकते अशा स्वरुपाचे वक्तव्य केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घातले तर, शिवसेना व भाजपामध्ये पुन्हा मैत्रीचा पूल बांधला जाऊ शकतो, असे सत्तार म्हणाले होते. या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'मार्मिक' टिप्पणी केली. 

'नितीन गडकरी हे करु शकतात असं अब्दुल सत्तार यांना वाटतं याचा मला आनंद आहे. नितीन गडकरी मोठे नेते आहेत पण अब्दुल सत्तार नया है वह. त्यांना शिवसेनेचे काहीच माहिती नाही. गेल्या पाच सहा महिन्यांमध्ये ते उद्धव ठाकरेंना भेटले असल्याचे मला माहिती नाही. असं बोलण्यासाठी कुणी महत्त्वाचा माणूस लागतो'; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याआधी नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ आहेत. त्यांनी पूल बांधायचे ठरवले तर ते कसेही आणि कुठेही उभे राहू शकतात. भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा मैत्रीचा पूल उभारून दोन्ही पक्षांमधील नातेसंबंध जोडले जाऊ शकतात. गडकरी यांनी मनावर घेतले तर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ शकतील. गडकरी व अमित शहा यांनी पुढाकार घेतला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे सत्तार म्हणाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी