राजकारणातील कटुता दूर होणार? फडणवीसांनी केलं मोठं विधान

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 10, 2022 | 16:46 IST

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी नेमकं काय म्हटलं? पाहा...

Devendra Fadnavis reaction on sanjay raut statement about political rival watch video
Devendra Fadnavis on Sanjay Raut | राजकारणातील कटुता दूर होणार? फडणवीसांनी केलं मोठं विधान 

Devendra Fadnavis on Sanjay Raut: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊत काय बोलले ते मी ऐकलं नाही आणि त्याबाबतची प्रतिक्रिया मी देणार नाही. पण मला भेट मागितली तर मी सर्वांनाच भेट देतो त्याला काही अडचण नाही. इतकंच आहे की, राजकारणातील कटुता दूर करायची असेल तर सर्वांना मिळून ठरवावं लागेल कोणताही एक पक्ष ही दूर करु शकत नाही. नेत्यांनी शांत रहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं ही पद्धत बंद करायला हवी.

संजय राऊत काय बोलले हे मी खरंच ऐकलं नाही. कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे तो निर्णय योग्य आहे की अयोग्य यावर ईडी बोलू शकेल. त्याच्या विरोधात ते उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे आता त्यावर काही बोलणं हे माझ्यासाठी तरी योग्य होणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी