ब्रेकिंग: देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 17:09 IST

Devendra Fadnavis resign: देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा 
  • मुख्यमंत्रिपदाचा देवेंद्र फडणवीस यांनी दिला राजीनामा
  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे दिला राजीनामा

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. १३व्या विधानसभेचा कार्यकाळ आज (८ नोव्हेंबर) रोजी संपत आहे त्यामुळे तांत्रिकदृष्टया देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गिरीश महाजन, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे हे सुद्धा उपस्थित होते. 


राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचा तिढा अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन १४ दिवस उलटले असतानाही राज्यात नव सरकार स्थापन झालेलं नाहीये. निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. भाजपने १०५ जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने ५६ जागां जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडे गेल्या आहेत.

शिवसेना फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर ठाम असून मुख्ममंत्रिपद अडीच-अडीच वर्षे देण्यात यावं अशी मागणी करत आहे. तर भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. राज्यात महायुतीचंच सरकार येणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्रृत्वातच राज्यात नवं सरकार स्थापन होणार असा दावाही भाजप नेते करत होते. मात्र शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने सत्ता संघर्ष अजूनही सुरुच आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
ब्रेकिंग: देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा Description: Devendra Fadnavis resign: देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola