Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय कटुता निर्माण झाली. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ही कटुता आणखी वाढली. या संदर्भातील सर्व प्रश्नांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. 'एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या मैत्रीवर सुद्धा भाष्य केलं आहे. (Devendra Fadnavis sent a special message to rashi Thackeray for uddhav Thackeray read details in marathi)
उद्धव ठाकरे आणि तुमची चांगली मैत्री होती. पण गेल्या अडीच वर्षांत तुमच्यात कटुता वाढली यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजही उद्धव ठाकरेंसोबत काही वैर नाही पण मातोश्रीचे दरवाजे माझ्याकरिता त्यांनी बंद केले. माझा फोनही त्यांनी घेतला नाही. पाच वर्षे आपण ज्यांच्यासोबत काम करतो, ज्यांच्यासोबत सरकार चालवतो, सौजन्य म्हणून त्यांचा किमान फोन घेऊन सांगून शकता की, तुमच्यासोबत यायचं नाहीये. पण तुम्ही मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी बंद केले याच मला दु:ख आहे.
हे पण वाचा : बडीशेप खा आणि चमत्कार पहा
फडणवीसांनी म्हटलं, दुसरी गोष्ट अशी की, मी राजकीय वैर ठेवत नाही. आमचं सरकार राजकीय वैराने वागणार सुद्धा नाही. पण गेल्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या, मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट मुंबईच्या सीपींना दिलं होतं. मला जेलमध्ये टाकू शकतील असं मी असं काहीच केलं नव्हतं त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. पण कुठल्याही परिस्थितीत मला अटकवा, जेलमध्ये टाका अशा प्रकारचे आदेश मविआ सरकारमधले होते. माझ्याकडून कुठलीही कटुता नाहीये. राजकीयदृष्ट्या मी त्यांचा विरोधक आहे पण वैयक्तिक माझं त्यांच्यासोबत वैर नाही.
हे पण वाचा : डोक्यापासून ते पायापर्यंत व्हिटॅमिन ई चे असंख्य फायदे
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, परवा एका कार्यक्रमात मला रश्मी वहिनी भेटल्या त्यांच्यासोबत सुद्धा मी बोललो आणि वहिनींना सुद्धा सांगितलं की, उद्धवजींना माझा नमस्कार सांगा. खरंतर महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्या संस्कृतीच्या पलिकडे मी कधीच जाणार नाही.
हे पण वाचा : नारळ पाणी प्या अन् वजन कमी करा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विस्ताराची प्रक्रिया बाकी आहे. हे सरकार पूर्णपणे कायदेशीर स्थापित आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेत जेव्हा एकाच वेळी सारखे प्रश्न मांडले जातात, चर्चा होतात तेव्हा अडचणी येतात. त्यामुळे आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करायचा आहे. हा विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आम्हाला करायचा आहे.
हे पण वाचा : ओव्याचे गुणकारी फायदे तुम्हाला माहितीयेत का?
उद्धव ठाकरे यांनी चॅलेंज दिलं की, तुम्ही मोदींचे फोटो लावा आम्ही बाळासाहेबांचे फोटो लावतो पाहूयात निवडणुकीत कोणाला मतं मिळतात? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे आव्हान देण्यापूर्वी त्यांनी लक्षात घ्यायला हवं होतं की, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मोदींचे मोठ-मोठे फोटो लावून ते निवडून आले... बाळासाहेब तर आमचे नेते आहेतच त्याचा फोटो आम्ही लावूच... ठाकरेंसोबतच्या काहींनी उद्धवजी, बाळासाहेबांपेक्षा मोदींचा फोटो मोठा लावून निवडून आले. आता कसलं चॅलेंज देत आहात. बाळासाहेब ठाकरे हे त्यांची खासगी मालमत्ता नाहीये. बाळासाहेब ठाकरे मालमत्ता असेल तर ते शिवसेनेची, महाराष्ट्राची आहे. तसेच शिवसेनाही उद्धवजींची खासगी मालमत्ता नाहीये. त्यामुळे 80 टक्के शिवसेना आणि शिवसैनिक हे एकनाथ शिंदेंसोबत आले आहेत. खरी शिवसेना ती आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.