Devendra Fadnavis: या दिवशी फडणवीस 'पुन्हा येणार', तारीख ठरली !

मुंबई
सुनिल देसले
Updated Jun 23, 2022 | 14:53 IST

Devendra Fadnavis statment 'mi punah yein': राज्याचे मुख्यमंत्री असताना आपल्या शेवटच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन' म्हटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात मविआचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं. पण आता फडणवीसांचं हे स्वप्न पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे.

Devendra Fadnavis Twitter photo
Devendra Fadnavis: या दिवशी फडणवीस 'पुन्हा येणार', तारीख ठरली !  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांच्या संख्येत आणखी वाढ, आमदारांचा पाठिंबा वाढल्यानंतर शिंदेंचं शक्तिप्रदर्शन
  • एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे १० खासदार सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यापैकी चार खासदार हे गुवाहाटीला दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) अडचणीत आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या शिवसेनेच्या आणि अपक्ष आमदारांची संख्या वाढतच आहे. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ४५ आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार (Thackeray Government) चांगलेच अडचणीत आले आहे. मविआच्या गोटात घडलेल्या या राजकीय भूकंपाचा फायदा नक्कीच भाजपला होणार आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आणि आपली रणनिती आखण्यास सुरुवात केल्याचं वृत्त समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत संख्याबळ अधिक आले असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे १० खासदार सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यापैकी चार खासदार हे गुवाहाटीला दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपकडून एक मोठी ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरनुसार, एकनाथ शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रिपद, राज्यात ८ कॅबिनेट मंत्रिपद, ५ राज्य मंत्रिपद आणि केंद्रात दोन मंत्रिपद देण्यात येणार आहे.

शपथविधीची तारीख ठरली?

एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपचे ऑफर स्वीकारल्याचं बोललं जात असून भाजपसोबत मिळून सत्तेत सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. इतकंच नाही तर शपथविधीसाठीची तारीखही निश्चित केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, येत्या ३ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असं बोललं जात आहे.

शिंदे गटाने भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केल्यास देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री असताना विधानसभेत केलेल्या शेवटच्या भाषणावेळी फडणवीसांनी एक कविता म्हटली होती आणि त्याच्या शेवटी 'मी पुन्हा येईन' असं म्हटलं होतं. मात्र, विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना-भाजपत बिनसलं. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे हे विराजमान झाले अन् देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न भंगलं. पण आता एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न पून्हा पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी