Devendra Fadnavis Metro: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shindee) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी आज (२१ जुलै) मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये गणेशोत्सव, (Ganeshostav) दहीहंडी (Dahi Handi) हे सण उत्साहात साजरे केले जावे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मात्र, याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांचा सूर मात्र अचानक बदलेला दिसून आला. (devendra fadnavis tone changed said i am answering with chief minister permission aarey metro carshed )
पत्रकार परिषदेत जेव्हा आरे कारशेडबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीसे सावध झाले. खरं म्हणजे हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. मात्र, फडणवीसांनी त्याचं सविस्तर उत्तर दिलं. मात्र, हे उत्तर देण्याआधी फडणवीसांनी रितसर मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली.
'मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन याच्यावर उत्तर देतो..' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेडबाबत बोलण्यास सुरुवात केली.
मुख्यमंत्र्यांसमोरील माईक खेचल्याने झालेली टीका
काही दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक थेट खेचून देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: उत्तर दिलं होतं. मात्र, त्यांच्या या कृतीवरुन विरोधकांनी त्यांच्यावर बरीच टीका केली होती. फडणवीस हे अद्यापही मुख्यमंत्री असल्यासारखेच वावरत आहेत. असंही त्यांच्या विरोधकांनी यावेळी म्हटलं होतं.
अधिक वाचा: उद्धव ठाकरेंना झटका, आरे कारशेडवरील बंदी CM शिंदेंकडून मागे
मुख्यमंत्री हे फक्त नामधारी आहेत सगळा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवतात असं राजकीय वर्तुळात देखील बोललं जात आहे. अशी सातत्याने होणारी टीका लक्षात घेऊन फडणवीसांनी आपला सूर आता बदलला आहे. त्यामुळेच आज जेव्हा आरे कारशेडचा प्रश्न आला तेव्हा फडणवीस चक्क असं म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन तुमचं उत्तर देतो...
खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांना विरोधक सातत्याने टार्गेट करत आहेत. त्यामुळेच आता फडणवीसांनी आपल्या कारभाराची शैली बदलून ते अचानक मवाळ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अधिक वाचा: ज्यांना 20 आमदारांचा पाठिंबा नाही त्यांना सीएम करणार?: साळवे
पाहा आरे कारशेडबाबत उपमुख्यमंत्री काय म्हणाले:
'या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कोणी नाही'
'मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन याच्यावर उत्तर देतो. कारण असं आहे की, याच संस्थांनी आंदोलन केलं ते उच्च न्यायालयात गेले. त्यांच्याविरोधात निकाल दिला. ते सुप्रीम कोर्टात गेले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात लिहलं आहे की, जी झाडं आपण त्या ठिकाणी कापली ही त्यांच्या संपूर्ण जीवनात जेवढं कार्बन घेतील तेवढं ही मेट्रो ८० दिवसात करेल.'
अधिक वाचा: 'वर्षभरापूर्वीच युतीबाबत ठाकरेंची मोदींसोबत झालेली चर्चा'
'हे सांगून या ठिकाणी २ लाख मेट्रिक टन एवढं कार्बन उत्सर्जन हे आपण थांबवणार आहोत. ही मेट्रो एक-एक दिवस उशीर करणं म्हणजे मुंबईकराला प्रदूषणाच्या माध्यमातून त्याचं आयुष्य कमी करण्यासारखं आहे. या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कोणी नाही.' असं फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं.
'कारशेडसाठी आरेची जागा पृथ्वीराज चव्हाण सरकारने केलेली फायनल'
'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काम सुरु झालं. कुठलंही आंदोलन नव्हतं. २५ टक्के काम पूर्ण झालं. त्यानंतर ते काम बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे माझं मत आहे की, पर्यावरणवाद्यांचा आम्ही आदर करतो. पण सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जर कोणी थांबवायचा प्रयत्न करत असेल तर त्यामागे सरहेतू आहे का असाही प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या हिताकरीता हा निर्णय घेतलेला आहे. २५ टक्के काम झालं आहे. २५ टक्के काम वेगाने पूर्ण केलं तर रोज जे मुंबईकर लोकलच्या गर्दीमुळे गुदमरतात काही मृत्यूमुखी पडतात त्यांना ही ४० किमीची लाइफलाइन मिळणार आहे. म्हणून हा निर्णय अतिशय योग्य प्रकारे घेण्यात आला आहे.'
अधिक वाचा: Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले 50 लाखांचे टार्गेट
'एक मुद्दा जाणीवपूर्वक नमूद करायचा आहे की, पहिल्यांदा ही जागा पृथ्वीराज चव्हाण सरकारने फायनल केली होती. त्यानंतर आमचं सरकार आलं आणि आम्ही करार केला. त्यावेळी आमच्याकडे मागणी आली होती की, तुम्ही हे कांजूरला शिफ्ट करा. त्यावेळेस आम्ही समिती तयार केली होती. त्या समितीने सांगितलं होतं की, हे शिफ्ट करणं शक्य नाहीए. तरी आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने सांगितलं ३ हजार कोटी भरा आणि मग आम्ही निकाल देऊ.' असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
'उद्धव ठाकरेंनी इगोकरिता निर्णय बदलला..'
'त्यानंतर आम्ही आरेची जागा फायनल केली. उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आणि त्यांनी एक कमिटी नेमली. या कमिटीने देखील हेच सांगितलं की, आरेमध्येच कारशेड केलं पाहिजे. हे कांजूरमार्गला होणार नाही. इतकं स्पष्ट समितीने सांगितल्यानंतरही केवळ त्यांनी घेतला गेलेला निर्णय हा इगोकरिता घेतलेला निर्णय होता. मुंबईकरांच्या हिताकरिता घेतलेला निर्णय नव्हता.' असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.