अमृता फडणवीस यांनी ट्वीट करताच शिवसेनेने दिलं 'असं' उत्तर

मुंबई
सुनिल देसले
Updated Dec 08, 2019 | 21:28 IST

Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील सत्तासंघर्ष आता आणखी वाढत असल्याचं दित आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ट्वीट करुन शिवसेनेवर निशाणा

devendra fadnavis wife amruta bjp shivs sena leader priyank chaturvedi twitter war tree cutting politics news marathi
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करताच शिवसेनेने दिलं 'असं' उत्तर 

थोडं पण कामाचं

  • प्रियंका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस यांच्यात ट्वीटर वॉर
  • अमृता फडणवीस यांनी ट्वीट करुन शिवसनेवर केली टीका
  • अमृता फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलं प्रत्युत्तर
  • वृक्षतोडीवरुन अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्वीटर वॉर 

मुंबई: महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरुन निर्माण झालेल्या तिढ्यानंतर आता दोन्ही पक्षांतील मतभेद आणखी वाढताना दिसत आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. याच दरम्यान माजी मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी या सर्व प्रकारात उडी घेत शिवसेनेवर ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली आहे. अमृता फडणवीस यांनी टीका करताच त्याला शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात सत्तेत येताच शिवसेनेने मुंबईतील आरे कॉलनीतील कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. आरेतील एकही झाड यापुढे कापू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली. यानंतर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वृक्षतोडीवर रविवारी एक ट्वीट केलं. एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. अमृता फडणवीस यांनी म्हटलं, "शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार झालाय, लवकर बरे व्हा. तुमच्या सोयीप्रमाणे किंवा दलाली मिळेल तेव्हा झाडांची कत्तल होणार का? हे अक्षम्य पाप आहे". अमृता फडणवीस यांनी ज्या बातमीचा हवाला देत ट्वीट केलं आहे त्या रिपोर्टमध्ये औरंगाबाद येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १००० झाडांची कत्तल शिवसेना करणार आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करताच अवघ्या काही वेळात शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही ट्वीट करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं की, "मॅडम, तुम्हाला हे ऐकल्यावर तुमची थोडी निराशा होईल पण मी तुम्हाला सांगते की, स्मारकासाठी एकाही झाडाची कत्तल होणार नाही. औरंगाबादच्या महापौरांनीही हे स्पष्ट केलं आहे. झाडांच्या कत्तलीसाठी दलाली घेणं, हे भाजपचं नवं धोरण आहे का?"

शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तास्थापनेवरुन निर्माण झालेल्या तिढ्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत मिळून सत्तास्थापन केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनताच त्यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी