'Devendra Fadnavis will be next CM,' says BJP ally Ramdas Athawale : महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठी भविष्यवाणी केली. 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन... असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार. फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार' असे रामदास आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन होईल आणि फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशा स्वरुपाचा विश्वास व्यक्त केला. आठवले यांच्या वक्तव्यावर अद्याप भारतीय जनता पार्टीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याआधी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेले बंड हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रातल्या ताज्या राजकीय घडामोडींवर बोलताना फडणवीस मुख्यमंत्री होतील असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. तसेच एक विशेष शीघ्र कविता करून रामदास आठवले यांनी पत्रकारांसमोर सादर केली.
आठवलेंची कविता...
जिन्होंने उद्धव ठाकरे की राजनिति के बंद कर दिये धंदे , उनका नाम है एकनाथ शिंदे .
एकनाथ शिंदे और सभी MLA है बालासाहब के बंदे , अब वो नहीं रहे है अंधे .
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.